मुरबाड माळशेज घाट सोमवार पर्यंत बंद राहणार!

    24-Aug-2018
Total Views |


 

 

मुरबाड : कल्याण / मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुरबाड माळशेज घाटात गेल्या मंगळवारी पहाटे अडीच च्या सुमारास मोठी दरड कोसळून या घटनेत टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. तसेच मंगळावर ते आज शुक्रवार पर्यंत जवळपास ५० तास उलटून गेले तरी अजूनही मुरबाड माळशेज घाट बंद आहे. त्यामुळे घाट मार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. तसेच मुरबाड बस आगारातून १२ शेडूल बंद करण्यात आले आहेत. तसेच कल्याण बस आगारातून सुद्धा २० शेडूल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्हीं आगारचा एकूण २५ ते ३० लाख रुपयाचा नुकसान झाल्याची माहिती दोन्हीं आगर प्रमुखांनी दिली आहे.
 

सदर माळशेज घाटात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम खात्यातर्फे ४ जेसीबी मशीन लावून घाटातील पडलेल्या दगडी उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. परंतु घाटात धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने तसेच वरून मोठ-मोठे दगड अजूनही पडतात. तसेच संततधार पावसाचे प्रमाण कायम आहे. या तिन्ही गोष्टीमुळे घाटात काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे अजूनही ३-४ दिवस घाट बंद राहील अशीं शक्यता राष्ट्रीय महामार्ग मुरबाड उपअभियंता सुनील पाटील यांनी दिली. तसेच घाट बंद असल्यामुळे नगर,आळेफाटा, मंचर, जुन्नर येथून येणार भाजीपाला थांबल्याने टोकावडे ते कल्याण दरम्यान भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्याने दिली आहे. तसेच मुरबाड, टोकवाडे पोलीसठाण्या मार्फत शनिवार व रविवार पर्यटकांना पूर्ण घाट बंदी केली आहे. अशी माहिती मुरबाड पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वसावे व टोकावडे पोलीसठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती घेण्यासाठी कल्याण प्रांत अधिकारी प्रसाद उकिरडे व मुरबाड तहसीलदार सचिन चौधर यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घाटाची पाहणी केली. व त्यावर मुरबाड तहसीलदार कार्यालयाचे नियंत्रण असल्याचे दिसून येत आहे. मंगळवार ते शुक्रवार पर्यंत कल्याण प्रांतअधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सचिन चौधर यांनी माहिती घेतली आहे. व त्यांनी सांगितले अजूनही ३ ते ४ दिवस घाट बंद राहील अशी माहिती दिली आहे. परंतु या घाट बंदीमुळे छोट्या छोट्या व्यवसायिकांवर परिणाम झाला आहे.तसेच घाट बंदीमुळे गेल्या २ आठवडाभरापासून हजारो पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने काही पर्यटकांनी जवळच्या छोट्या छोट्या धबधब्यावर जाणे पसंत केले आहे. परंतु हिरव्या शालूने नटलेल्या माळशेज घाटाची परंपरा हि वेगळीच आहे अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने गाडी चालवल्यामुळे झालेल्या मृत्यूंसाठी विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार नाही : सर्वोच्च न्यायालय

बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंबिय मोटार वाहन कायदा, १९८८ (एमव्ही कायदा) अंतर्गत भरपाईसाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने, बुधवार दि.२ जुलै रोजी दिला आहे. न्यायमूर्ती पी.एस. नरसिंह आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाने याआधी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी कलम १६६ अंतर्गत केलेली भरपाईची मागणी फेटाळून लावली होती...

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

ना झेंडा, ना अजेंडा... नेता कोण? - राज-उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा ठरली; पण शेवटी भाषण कोण करणार, यावर घोडे अडले

त्रिभाषा सूत्रावरून उगाचचा गोंधळ घालणाऱ्या ठाकरे बंधूंना अखेर एकत्र येण्यासाठी कारण मिळालं. सरकारने निर्णय मागे घेतल्यानंतर दोघांनीही 'विजयी सभा' जाहीर केली, जणू काही हा लढा त्यांनीच उभारला होता! ५ जुलै रोजी वरळीच्या डोम मैदानावर ही सभा होणार आहे. पण या तथाकथित एकजुटीला ना मराठी भाषेचं भान आहे, ना मराठी माणसाच्या भविष्याची चिंता. फक्त एकत्र येण्याचं निमित्त हवं होतं, ते मिळालं इतकंच. बरं, इतकं करूनही आतल्या गोटात सध्या गोंधळ आहे तो ‘शेवटी भाषण कोण करणार?’ या मुद्द्यावर! राज ठाकरे हे प्रभावी भाषणांसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121