भरधाव ट्रकने 6 वर्षीय बालिकेस चिरडले

    22-Aug-2018
Total Views | 16
 
 
 
भरधाव ट्रकने 6 वर्षीय बालिकेस चिरडले
फैजपूर, 22 ऑगस्ट
रासायनिक खते घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकने बालिकेस चिरडल्याने 6 वर्षीय बालिकेचा जागीस मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
 
विशाखा ही बालिका बुधवाररोजी तिची आजी कल्पना प्रदीप भालेराव रा.भुसावळ यांच्या सोबत फैजपूर येथे नातेवाईकांच्या उपचारासाठी गेली होती. आजीकडून कुरकुरे घेण्यासाठी पैसे घेवून विशाखा कुरकुरे आणण्यासाठी दुकानात गेली. दुकानातुन ती परतत असतांना समोरुन आलेल्या भरधाव ट्रक क्र.एमपी 09 एचएफ 1733 ने तीला चिरडले यात तीचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी ट्रक चालक प्रभू कालू सिंग रा. लाखनकोट, जि.दहाट, मध्यप्रदेश यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121