लाख येथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच पक्का डांबरी रस्ता, बससेवा

    03-Jul-2018
Total Views | 22

ना. महाजन यांचे प्रयत्न यशस्वी, परिसरातील जनता खुश

 
 
लोहारा, ता.पाचोरा :
तालुक्यातील लाख या ३० ते ४० वस्ती असलेल्या गावी आजपावेतो कुठलाही रस्ता अथवा बस सेवा नव्हती त्यामुळे गावातील लोक सर्व आधुनिक काळात सर्व सेवा सुविधापासून वंचित होते. सोमवारी, ३ जुलै रोजी ना. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे लाख गावातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या रस्त्याचे लोकार्पण जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच साधनाताई महाजन यांनी कुर्‍हाड ते लाख बसने प्रवास केला. त्यावेळी लाख या गावात ग्रामस्थांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
 
 
या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ भाजपा नेते छगन झाल्टे, संजय पाटील, गणेश गोसावी, कैलास चौधरी, जगदीश तेली, डॉ. केयुर चौधरी, किरण पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात कॉंग्रेस पक्षाची सुमारे ६० वर्ष एकछत्री सत्ता राहिली. राज्य आणि जिल्ह्यातही सत्तेचे केेंद्र कॉंग्रेस भोवती राहीले, मात्र या छोट्याशा गावी प्राथमिक सुविधा देण्याचे कर्तव्यही कॉंगे्रसच्या नेत्यांना आणि कार्यकत्यांना बजावता आले नाही.  या तुलनेते भाजप - सेना युतीच्या कार्य काळात जलसंधारणाची कामे, पाणी टंचाईवर मात, उज्ज्वला गॅस योजनेंद्वारे झोपड्यांपर्यंत गॅस सिलेंडरचा पुरवठा अशा अनेक सुविधा निर्माण केल्या जात आहे. त्याबद्दलही यानिमित्ताने जनतेत समाधान व्यक्त होताना आढळले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121