वाडीलाल राठोड यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

    07-Jun-2018
Total Views | 87

खडसेंसह जिल्हा भाजपच्या नेत्यांची हजेरी
‘भाजपच्या भरारीत भाऊंचा सिहांचा वाटा’


 
चाळीसगाव :
ज्या वेळी जनसंघ, भाजपाचा कार्यकर्त्याला हिणवले जायचे, त्या काळापासून वाडीलाल भाऊंनी कुशल संघटनाच्या बळावर तालुक्यात घराघरात पक्ष नेत कमळ फुलविले. उत्तमराव पाटील यांच्या लोकसभा विजयानंतर तालुक्यात भाजपाचा वटवृक्ष उभा केला, नव्हे तर भाजपचे आमदार, खासदार असे नेतृत्व उदयाला आणण्यासाठी जिवाचे रान केले, आपले दुकान हे पक्षाचे कार्यालय समजून बंजारा समाजासह कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवताना वाडीलालभाऊ शेवटपर्यंत आग्रही राहिले त्यांच्या अकाली निधनाने पक्षाबरोबर माझा जवळचा मित्र गमावल्याचे दुःख आहे, अशी भावपूर्ण श्रद्धांजली भाजपचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी शोकसभेत व्यक्त केली.
 
 
जिल्हा भाजपचे जेष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक वाडीलाल राठोड यांचे मंगळवारी सकाळी पहाटे पाच वाजता दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज ६ रोजी सकाळी पिंपरखेड येथे घराजवळील शेतात अंत्यसंस्कार झाले. आ.खडसे पुढे म्हणाले की, गोपीनाथराव मुंढे आणि कालपरवापर्यंत फुंडकर आता आता वाडीलाल राठोड यांचे निधन अतिशय वेदनादायक आहे. गोपीनाथ मुंढे यांच्या निधनाचे आम्हाला सर्वांना कायम दुःख आहे, त्यांच्या मृत्यूविषयी अजूनही संशय आहे, होता आणि राहिलही .वाडीलाल भाऊंचे आणि केंद्रीय मंत्री असलेले गोपीनाथराव यांचे संबंध अतिशय जवळचे होते. त्यांना एकेरी हाक मारण्याची त्यांची सवय होती, मी वाडीलाल भाऊंना नेहमी म्हणायचो भाऊ मुंढे आपले नेते आहेत त्यावर भाऊंचे उत्तर असायचेल,‘ ते तुमचे नेते आहेत माझे समाजबांधव आहेत...’ अशी दिलखुलास मैत्री जपणारा माझा मित्र काळाच्या पडद्याआड गेला आहे , त्यांच्या मुलाचे राजेंद्रचे तिकीट कापले गेले तेव्हापासून ते खचलेले वाटले, मात्र भाऊंनी पक्षासाठी अख्खी हयात घातली असल्याने भाजप त्यांच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीर उभे राहिल, अशी ग्वाहीही देत आ. खडसे यांनी गेल्या चाळीस वर्षाच्या आठवणींनाही उजाळा दिला
 
 
जिल्हा भाजप अध्यक्ष उदय वाघ, अमळनेरचे माजी आ.डॉ.बी. एस.पाटील, आ. उन्मेष पाटील, व्यापारी असो.चे अध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक माजी आ.राजीव देशमुख, माजी आ. साहेबराव घोडे, माजी आ.ईश्वर जाधव, गटनेते राजेंद्र चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, रिपाईचे काकासाहेब खंबाळकर, कल्पना मांडे, जी. जी. चव्हाण , सिध्देश्वर आश्रमाचे हभप ज्ञानेश्वर माऊली बेलदार वाडी, गोपाल चैतन्य महाराज, बेलगंगेचे चित्रसेन पाटील, खेडगाव विकास मंच चे प्रफुल्ल साळुंखे, जिल्हा दूध संघाचे प्रमोद पाटील, माजी पं.स. सभापती साहेबराव पुना चव्हाण, रावी संचालक विश्वास चव्हाण, शिवसेनेचे आर.एल.पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
 
 
रमेश चव्हाण, सुरेश स्वार, डॉ.सुनील राजपूत, चाळीसगाव एज्यु. सोसा.चे सचिव डॉ.विनोद कोतकर, संचालिका हेमांगी पूर्णपात्रे, माजी उपनगराध्यक्ष भगवान राजपुत, श्यामभाऊ देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रमोद सोनवणे, जेष्ठ पत्रकार किसन जोर्वेकर, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, डॉ.सत्यजित पूर्णपात्रेे, दडपिंप्रीचे माजी सरपंच नाना पवार, माजी नगरसेवक संजय घोडे, युवा मोर्चाचे कपिल पाटील आदी कार्यकर्ते नागरिक व पत्रकार बांधवांसह अनेक माता, भगिनी उपस्थित होत्या.
 
 
नेते, कार्यकर्त्यांसह १० हजारांचा जनसमुदाय
यांच्या निवासस्थानाच्या शेजारी शेतात चौथर्‍यावर सकाळी अकरा वाजता त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड व विलास राठोड यांनी अग्निडाग दिला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सुमारे दहा हजार नागरिक उपस्थित होते.
 
अखेरचा प्रवास ‘प्राणप्रिय’ शाळेद्वारे
राठोड यांच्या राहत्या घरासमोर त्यांची पहिली ते बारावी पर्यतची आश्रमशाळा आहे .त्यात शेकडो बंजारा विद्यार्थाची भोजन- निवासाची व्यवस्था भाऊंनी केलेली आहे. सकाळी भाऊंचा दिनक्रम शाळेत जात सुरू होत असे. त्यामुळे अंत्ययात्रा शाळेत नेण्यात आली. पार्थिवावर सेवा सहकारी संस्थेच्या सर्व शाखांतर्फे पुष्पांजली अर्पण झाली. यावेळी सारा परिसर गहिवरला होता.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121