रावेर तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी सज्जता

    30-Jun-2018
Total Views | 34

वनमहोत्सवासाठी वनविभागाची जय्यत तयारी; सेवाभावी संस्थाही सरसावल्या

 
रावेर : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून राबविण्यात येत असलेल्या वनमहोत्सवात मागील दोन वर्षाच्या लोकसहभागाच्या यशानंतर तृतीय वर्षात ‘एकच लक्ष १३ कोटी वृक्ष’ म्हणून रावेर तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी रोपांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून त्याची लागवडीपूर्व तयारी वनविभागासह इतर प्रशासनिक कार्यालयाची तयारी झाली आहे.
 
 
तालुक्यात २०१६ मध्ये २ लाख १६ हजार, २०१७ मध्ये ३ लाख ५५ हजार याप्रमाणे रोपांची लागवड करण्यात आली होती. अथक परिश्रमाने सर्वांच्या सहकार्याने हा टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यानंतर वनमंत्री ना.सुधीर मुनगंट्टीवार यांच्या संकल्पनेतून १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या महिन्यात संपूर्ण राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. उपवनसंरक्षक संजय दहिवले यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यात ४ लाख ६३ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींचा आणि सर्व शासकीय कार्यालये सहभागी होणार आहेत. यापैकी सर्व ग्रा.पं.मिळून १ लाख ४ हजार ५०० वृक्ष लागवड होईल. वनविभागाच्या पाल, सामाजिक वनिकरण विभाग (लालमाती) येथून उपलब्ध होणार आहेत. इतर यंत्रणांना पाल व यावल येथील रोपवाटिकेतून २८ हजार २४९ रोपे बंद पत्र भरून आपआपल्या स्थरावरून घेऊन जातील.
 
 
रावेर वनपरिक्षेत्र विभागाकडून वनविभागाच्या १४ ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असून यात मंगरूळ, जुनोना, पाल, निमड्या, मोरव्हाल, सहस्त्रलिंग, लालमाती, लोहारा, कुसूंबा, या भागातील राखीव वन जागेवर होणार आहे. रोपे वाहतूक व लागवडीबाबत काही तांत्रिक अडचणी दूर करणे किंवा मार्गदर्शन हवे असल्यास संबंधीत वन कर्मचार्‍यांशी संपर्क साधावा असेही आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी केले आहे.
 
 
यांची होती उपस्थिती
सामाजिक वनिकरण क्षेत्रपाल अरशद मुलानी, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, माऊली फाउंडेशनचे डॉ.संदीप पाटील, श्रीराम फाउंडेशनचे दीपक नगरे, वनपाल हरीश थोरात, अतुल तायडे, सविता वाघ, गजानन आढावणे, रवींद्र भामरे, शरद सोनवणे, ममता पाटील, प्रकाश सलगर, संजय भदाणे, यशवंत पाटील, संभाजी सूर्यवंशी, नीलम परदेशी, रोहिणी सोनार, सुपडू सपकाळे पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
 
मोहिमेत ५१ कर्मचारी ११ सेवाभावी संस्था सहभागी
वृक्ष लागवडीसाठी वनविभागाचे ५१ कर्मचारी, ११ सेवाभावी संस्था, सर्व स्थानिक शाळा, महसुल विभाग, गृहरक्षक दल, पोलीस विभाग, शासकीय दवाखाने, कृषी विभाग, यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, प्रतिष्ठीत व्यापारी व डॉक्टर्स यांच्यासह सर्व सुजाण नागरिक वनमहोत्सवामध्ये सहभागी होत वृक्ष लागवड करतील.
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121