शेळ्या-मेंढ्यांची चुकीच्या पद्धतीने निर्यात नको : खा.चव्हाण

    22-Jun-2018
Total Views | 56



नाशिक : ओझर विमानतळावरून शेळ्या-मेंढ्यांची निर्यात सुरू करण्यात आली असली तरी निकृष्ट पद्धतीच्या शेळ्या पाठविल्या गेल्यास भारताचे नाव काळ्या यादीत जाण्याची शक्यता असल्याचा इशारा खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या प्रादेशिक सह आयुक्तांना याबाबत त्यांनी पत्र दिले असून याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ’आय एल ७६’ या कार्गो विमानाद्वारे १४२१ शेळ्यांची निऱ्यात करण्यात आली. या शेळ्या-मेंढ्यांचा दर्जा निकृष्ट आहे. राजस्थानातील अजमेरच्या बाजारातून पीपीआर, एएफडी, ब्रेसला अशा आजाराने आजारी जनावरे स्वस्त दरात आणली जातात. त्या ट्रकने ओझर येथे आणून कोणतीही तपासणी न करता पाठविल्या जातात. मात्र नियमांचे पालन करून शेळ्या-मेंढ्या नीट विमानतळावर तपासून पाठविल्या जाव्यात, असे खा. चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय; महापालिकेच्या शिक्षकांसाठी प्रथमच झाली शिक्षण परिषद!

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय; महापालिकेच्या शिक्षकांसाठी प्रथमच झाली शिक्षण परिषद!

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले महापालिका शाळांतील शिक्षकांना मार्गदर्शन! महापालिका शाळांतील शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासह विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून महापालिका शाळांमधील शिक्षकांसाठी प्रथमच शिक्षण परिषदेचे आयोजन कल्याण मधील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवादही साधला...

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लोटला भक्तीचा महासागर!

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लोटला भक्तीचा महासागर!

आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा महासागर आज दि. ६ जुलै रोजी बघायाला मिळाला. टाळ मृदुंगाचा गजर करत, हरी नामाच्या भक्तीरसात तल्लीन होऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारकऱ्यांमुळे अवघा परिसर भक्तीमय झाला. तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पंढरपूरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी पंढरपूरात एकच गर्दी केली. प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121