
कल्याण : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत कारवाई करण्यात आली असून त्यात रस्त्याच्या दुतर्फा, दुभाजक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील एकूण 27 बॅनर्स आणि पोस्टर्स हटविण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार “ड” प्रभागातील अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्सवर सहा आयुक्त उमेश यमगर आणि त्यांच्या पथकाने निष्कासनाची धडक कारवाई गेल्या ३दिवसात केली. त्यामध्ये संतोष नगर नाला शौचालयाजवळ – 10×15 चे दोन होर्डिंग,
संतोषनगर कमानीजवळ –15×15 चे ते एक होर्डिंग
तिसगाव नाका येथील 20×20 चे एक होर्डिंग, ड' प्रभाग क्षेत्र– 10×10ची दोन होर्डिंग, दुर्गा इंपिरियल, कल्याण शीळ रोड – 20×40 चे एक होर्डिंग, आमराई चौक ते विजयनगर रस्ता – 20×20 चे एक होर्डिंग अशा एकूण आठ होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच सर्व जाहिरात एजन्सी, दुकानदार, व्यापारी यांनी अनधिकृत किंवा कालबाह्य परवानगीचे होर्डिंग्ज तात्काळ स्वतःहून काढून टाकावेत,तसेच कालबाह्य परवान्यांचे नूतनीकरण तातडीने करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे .