एस टी च्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2018
Total Views |
 

एस टी च्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

शिंदखेडा : शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाचा विद्यार्थी विक्की सुदाम बोरसे हा अमराळे येथील इयत्ता १२ वी चा विज्ञान शाखेचा गणित विषयाचा पेपर आटोपून अमराळे गावाकडे निघाला परंतु अमराळे गावास जाणारी बस रद्द करण्यात आल्याने शिंदखेडा वाडी गाडी क्र .एम एच २० डी ९४७३ या बस मध्ये प्रवास करीत असतांना बस अत्यंत गर्दीने भरलेली होती सदर वाहनात विक्की हा दरवाज्यात उभा होता .सदर बस रेल्वे स्टेशन कडे अत्यंत जोराने जात असतांना एस एस व्ही पी एस महाविद्यालया जवळ साई दत्त हॉस्पिटल च्या पुढे रोडवर बसमधून प्रवाशांच्या गर्दीमुळे बस चा दरवाजा जोराने उघडला गेला त्यामुळे दरवाजा जवळ उभा असलेला विक्की बोरसे रोडावर पडला त्याच्या डोक्याच्या मागील भागात जास्त रक्तस्राव झाल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता त्यास मृत घोषित करण्यात आले .

 
 याबाबत शिंदखेडा पोलीस स्टेशन ला ऋषिकेश बोरसे रा .अमराळे याने सदर घटनेबाबत बस चालक भालचंद्र अरविंद देवरे व वाहक मनोहर मधुकर सूर्यवंशी  या दोघांविरुद्ध  गुन्हा दाखल झाला असुन तपास पी एस आय बी जे . शिंदे करीत आहेत

एस टी महामंडळाचा गलथान कारभार पूर्ण ऐरणीवर आलेला असुन गाड्यांचे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सदरचा विद्यार्थ्यास प्राणास मुकावे लागले आहे .ऐनवेळी कुठ्लिही गाडी रद्द कारणे याबाबतीत प्रवाशांना माहीती न देणे जबाबदार अधिकारी मुख्यालयाला न थांबणे अनेक लेखी तक्रारी करून देखील कुठल्याही तक्रारीची दाखल न घेतल्यामुळे महामंडळाचे कर्मचारी मनमानी पद्धतीने वागत असल्याने त्यांच्या हलगर्जीपणामुळे एका शाळकरी विद्यार्थ्यास प्राणास मुकावे लागले आहे ऐनवेळी अमराळे गाडी रद्द केल्याने शिंदखेडा वाडी गाडीत प्रवाशी क्षमतेपेक्षा दुपटी पेक्षा अधिक प्रवाशी असल्याने वाहनाबाबत वाहक चालक गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असतांना दरवाज्याची कडी लावली नाही व क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असतांना वाहन सावकाश चालवणे असे असतांना मनमानी कारभार केल्याने अमराळे गावातील नागरिकात आक्रोष निर्माण झाला असुन तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे .

 
 

मयत  विक्की बोरसे हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असुन त्याच्या पश्चात २ बहिणी आई ,वडील असा परिवार असुन वडील अमराळे गावात शेती व्यवसाय करतात .


@@AUTHORINFO_V1@@