मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
जळगाव, २८ मार्च :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या प्रस्तावित चार उपकेंद्रांचे ई-भूमिपूजन शुक्रवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता ६६० मेगावॅट महानिर्मिती प्रकल्प, दीपनगर (ता. भुसावळ) येथे होणार आहे.
जामनेर तालुक्यातील २२० के.व्ही. उपकेंद्र केकतनिंभोरा, यावल तालुक्यातील २२० के.व्ही. उपकेंद्र खिरोदा, भडगाव तालुक्यातील १३२ के.व्ही. उपकेंद्र कोठली, मुक्ताईनगर तालुक्यातील १३२ के.व्ही. उपकेंद्र कर्की (पुर्नाड) या प्रस्तावित उपकेंद्रांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा पर्यटन, अन्न व औषध प्रशासन मंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे खासदार ए.टी. पाटील, रक्षाताई खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार स्मिताताई वाघ, डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपूर्व हिरे, चंदूभाई पटेल, डॉ. सतीश पाटील, संजय सावकारे, हरिभाऊ जावळे, चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, शिरीष चौधरी, उन्मेश पाटील, किशोर पाटील, प्रधान सचिव (ऊर्जा) अरविंद सिंह, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीवकुमार मित्तल, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापारेषणचे प्रकल्प संचालक रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापारेषणचे संचलन संचालक गणपत मुंडे, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता जयंत विके, ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.