उतावळे नाला-बहुळा नदीजोड प्रकल्प ‘मे’ अखेर पूर्ण करणार

    22-Nov-2018
Total Views | 69

ना. गिरीश महाजन यांची ग्वाही : भूसंपादनाची प्रलंबित प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत होणार


 
 
 
जामनेर
पाचोरा तालुक्यातील उतावळे नाला बहुळा नदीस बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस हिवरा नदी व पुढे गिरणा नदीत मिळतो. बराच वेळा सदर बहुळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही याकरिता उतावळे नाल्यावर सांगवी गावाजवळ वळण बंधारा बांधून पोच कालव्याद्वारे बहुळा प्रकल्पात पाणी टाकून बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी या प्रकल्पात टाकण्याचे या नदी जोड प्रकल्पात प्रस्तावित आहे.
 
या प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे आले असून 3300 मीटरपैकी 3 हजार मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे काम फेब्रुवारी 2019 अखेर करून मे पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली आहे.
 
 
जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी सांगितले की, उतावळी नदीजोड प्रकल्पाच्या कामासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत 2009 मध्ये 265 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती.
 
 
त्यात प्रकल्पअंतर्गत जोड कालवा व कालव्यावरील बांधकामे प्रस्तावित असून जोड कालव्याच्या ऐकून ते 3300 मीटर लांबी 3000 हजार मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे तसेच कालव्यावरील बांधकामेदेखील आता प्रगतीपथावर आहेत.
 
 
बर्‍याच कालावधीपासून रखडलेला सदर प्रकल्प हा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या लघुपाटबंधारे विभागाच्या कामाद्वारे प्रशासकीय मान्यता घेण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात विशेष निधी प्राप्त न झाल्यामुळे काम पूर्ण करणे अवघड झाले होते.
 
 
प्रकल्पाची अद्यावत किंमत 398.72 लक्ष इतकी असून या कामावर अद्याप 181 लक्ष रुपये खर्च झालेला आहे.प्रकल्पातील भूसंपादनाकरिता भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार संबंधितांना मोबदला वाटप करण्यात येणार आहे.
 
 
फेब्रुवारी 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले असल्याची माहिती ना.गिरीश महाजन यांनी दिली. तसेच नदीजोड प्रकल्पाचे बांधकाम मे 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन अधिकार्‍यांनी करावे असे आदेश देण्यात असल्याची माहिती ना.महाजन यांनी दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121