May

बिग बॉस फेम अभिनेत्री अमृता देशमुखचं “माय गो विठ्ठल” हे भक्तिगीत प्रदर्शित!

पंढरपूरच्या आषाढी वारीचं औचित्य साधत आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत "माय गो विठ्ठल" नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या अभिनयाने सजलेलं हे गीत आहे. अमृतासोबत गाण्यात वैभवी पवार आणि बालकलाकार शार्वी बागडे यांनी काम केले आहे. गाण्याच्या संगीताची धुरा निनाद म्हैसाळकर यांनी सांभाळली आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी गीतलेखन केले असून सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या सुमधूर आवाजात त्यांनी हे गाणं गायलं आहे.

Read More

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच एवढ

Read More

ग्रंथोपासक, समाजभूषण दाजी पणशीकर काळाच्या पडद्याआड!

रामायण, महाभारताचे गाढे अभ्यासक, तत्तवचिंतक दाजी पणशीकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राण ज्योत मालवली. ठाणे इथल्या त्यांच्या निवासस्थानी ६ जूनच्या सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वामध्ये व्यासंगी अभ्यासक अशी ज्यांची ख्याती होती त्या दाजी पणशीकरांनी समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्वाचं काम केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील कला विश्व पोरके झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केले आहे. दाजी पणशीकर यांच्या पार्थीवावर दि. ७ जून रोजी सकाळी ९:३० वाजता ठ

Read More

स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाची पहिली बैठक २ मे रोजी

first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd

Read More

दक्षिण भारतातील रामकथांची साहित्यसृष्टी तामिळ भाषेतील ‘कम्ब रामायण’

Kamba Ramayana दक्षिण भारतातील तामिळ ही जगातील संस्कृत एवढीच, प्राचीन अभिजात भाषा आहे. या भाषेत अनेक रामकथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यामध्ये इसवी सनाच्या नवव्या शतकात चोल राज घराण्याच्या राजवटीत, कम्बन् हा थोर महाकवी, चिंतक, तत्त्वज्ञ होऊन गेला. या महाकवीचे रामायण ‘कम्ब रामायण’ तथा ‘रामावतारम्’ म्हणून विश्वविख्यात आहे. जागतिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृती महाकाव्य म्हणून, कम्ब रामायणाचा गौरव केला जातो. ‘कविचक्रवर्ती’ अशा अनेक पदव्याप्राप्त कम्बन् हा राजकवी होता. तामिळ भाषा गौरव, कीर्तिस्तंभ म्हणून, दोन

Read More

"यूट्यूबवरील अश्लीलतेविरोधात कारवाईची गरज" : सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भुमिका!

डिजिटल प्लॅटफॉर्मवरील वाढत्या अश्लील सामग्रीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यूट्यूबवरील अश्लीलतेवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे सांगितले. हा मुद्दा यूट्यूबर रणवीर अल्लाबादिया याने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. रणवीर अल्लाबादियाने कॉमेडियन समय रैना याच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या यूट्यूब शोमध्ये एका अशोभनीय विनोद केल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल झाल्या होत्या. या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी त्याने केली होती.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121