सलग ३ दिवस बँका बंद

    22-Nov-2018
Total Views | 28



मुंबई : शुक्रवारी आलेल्या गुरुनानक जयंतीमुळे सलग ३ दिवस बँकांना सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात सर्व बँक सलग ३ दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे आजच बँकेत जाऊन तुमचे काम आटपून घेतलेले सोयीचे ठरणार आहे.

 

२३ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि २४ व २५ नोव्हेंबरला चौथा शनिवार व रविवार आहे. बँक जरी बंद असल्या तरी एटीएमद्वारे तुम्ही पैसे काढू शकता. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड राहील याची खबरदारी घेतली आहे. बँक जरी बंद असल्या तरी नेट बँकिंग हा देखील एक पर्याय आहे. या वर्षात अनेक वेळा सलग बँका बंद राहतील अशा सुट्ट्या येत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121