आधारभूत किंमत योजनेतंर्गतजिल्ह्यात 20 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर1 नोव्हेंबर पासून खरेदी केंद्र होणार सुरु

    24-Oct-2018
Total Views | 42

 
आधारभूत किंमत योजनेतंर्गत
जिल्ह्यात 20 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजूर
1 नोव्हेंबर पासून खरेदी केंद्र होणार सुरु
जळगाव,. 23 -
शासनाने सन 2018-19 या खरीप पणन हंगामातील ज्वारी, मका, बाजरी हे भरडधान्य आधारभुत किंमत योजनेतंर्गत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यात एकुण 20 ठिकाणी भरडधान्य खरेदी केंद्र मंजुर केले आहे. या केंद्रामार्फत चालु हंगामात शासनाच्यावतीने 1 नोव्हेंबर पासून भरडधान्य खरेदी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
 
 
या धान्य खरेदी केंद्रावर ज्वारी, मका, बाजरी या भरडधान्याची खरेदी करण्यात येणार असून ज्वारी (संकरीत) 2 हजार 430 रुपये प्रति क्विटल, ज्वारी (मालदांडी) प्रती क्विंटल 2 हजार 450 रुपये, मका 1 हजार 700 रुपये प्रति क्विंटल, तर बाजरी 1 हजार 950 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. सर्व साधारण गुणवत्ता दर्जाचेच (एफ.ए.क्यु.) धान्य या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात येणार आहे .
 
भरडधान्य (ज्वारी, बाजरी, मका) हे 1 नोव्हेंबर, 2018 ते 31 डिसेंबर, 2018 या कालावधीत तालुकास्तरावर केंद्रनिहाय खरेदी करण्यात येणार आहे. जिल्हयात जळगाव, अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, शेदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव येथे प्रत्येकी एक तर जामनेर तालुक्यात जामनेर व शेंदुर्णी येथे दोन असे एकूण 16 खरेदी केंद्र तर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्या, नंदुरबार यांच्या अभिकर्ता संस्थेतील आदिवासी भागात यावल तालुक्यात हरिपुरा, पाल, कर्जोणा, सत्रासेना असे एकूण चार याप्रमाणे जिल्ह्यात 20 खरेदीसाठी केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. हे खरेदी केंद्र प्रत्येक तालुक्यातील शेतकी सहकारी संघ लि.येथे व बोदवड को. ऑप. सेल परचेस युनि. लि. तसेच शेंदुर्णी सह खरेदी विक्री जिल्हा प्रोसेसिंग सोसायटी लि. येथे त्याचबरोबर हरीपुरा संस्थेचे, पाल येथे महामंडळाचे खरेदी केंद्र, कर्जाणा संस्थेचे व सत्रासेन संस्थेचे येथे सुरु करण्यात येणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121