शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपीवर चाकू हल्ला

    23-Oct-2018
Total Views | 24
 
 

मुंबई : शक्ती मिल सामुहीक बलात्कार प्रकरणातील तडीपार असलेला आरोपी आकाश जाधव याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. आकाशवर सध्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग्रीपाडा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून तपासाला सुरुवात केला आहे. आकाश सध्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

 

३१ जुलै २०१३मध्ये मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी आकाश जाधव या आरोपीला न्यायालायने वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्या वागणुकीत काहीही बदल आढळला नाही. त्यानंतरही अनेक गुन्हे त्याच्याविरोधात दाखल होत असल्याने पोलिसांनी त्याच्यावर तडीपारची कारवाई केली होती. आकाश त्याच्या राहत्या परिसरात येऊन दुसऱ्या गटाला दमदाटी करत असे. सोमवारी एका गटाने त्याच्यावर चाकू हल्ला केला. यात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121