'या' दोघींना बांधून ठेवणारा धागा कोणता असेल?

    04-Jan-2018
Total Views | 29

 
 
प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पहायला मिळणे हि पर्वणीच म्हणावी लागेल. आणि विशेष म्हणजे ही पर्वणी येत्या १६ फेब्रुवारीला आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. प्रिया व मुक्ता 'आम्ही दोघी' या आगामी चित्रपटातून आपल्याला दिसतील. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगत आहे.
 
 
मुक्ता आणि प्रिया दोघीनींही हे पोस्टर त्यांच्या सोशल अकाऊंटवर प्रसिद्ध केले असून त्याखाली त्यांनी, ''आम्ही नखशिखान्त वेगळ्या तरीही आम्हाला बांधणारा धागा एक...'' अशी कमेंट केली आहे. आता नक्की या दोघींना बांधणारा धागा काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या आधी या दोघींच्याही व्यक्तिरेखांची ओळख करून देणारे पोस्टर्स प्रदर्शित झाले होते, त्याला देखील नेटिझन्सनी चांगला प्रतिसाद नोंदवला. प्रिया बापट सावित्री सरदेसाई तर मुक्ता बर्वे अमला या व्यक्तिरेखा साकारत आहेत.
 
 
 

प्रतिमा जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून पूजा छाब्रिया चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. एकूणच हा चित्रपट दोन भिन्न स्त्रियांचे व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडू पाहतो आहे. स्त्री केंद्रित चित्रपट असल्याचे पहिल्या पोस्टर वरूनच लक्षात आले होते. हळूहळू या चित्रपटाबाबत आणखी उलगडा होत जाईल...
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121