देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सीपी राधाकृष्णन यांची मंगळवारी निवड झाली. त्यांनी इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ तर रेड्डी यांना अवघी ३०० मते मिळाली.
Read More
काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्
नमाजवादी इंडी आघाडीचा देशात शरिया लागू करण्याचा स्पष्ट अजेंडा आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केला आहे.
निवडणुकांचा मौसम आला की ‘इंडी’ आघाडीच्या ( Indi Aghadi ) तोंडदेखल्या एकतेला आणखीन तडे जातात. तसाच अपेक्षित प्रकार आता दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही समोर आला असून, ‘आप’ आणि काँग्रेस हे पक्ष निवडणुका स्वतंत्र लढविणार आहेत. तसेच ‘एकला चलो रे’चे वारे बिहारमध्येही वाहू लागले आहेत. त्यामुळे ‘इंडी’ आघाडीचा पोपट अखेरीस मेला का, असा सवाल उपस्थित होणे साहजिकच.
Indi alliance विशेष प्रतिनिधी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजधानीत दररोज राजकीय नाट्य घडत आहे. निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे.
‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. ममता बॅनर्जी या अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत, हे माहिती असूनही ‘इंडी’ आघाडी टिकवून ठेवायची असेल, तर विरोधकांना अन्य कोणता पर्याय सध्या दिसत नाही. राहुल गांधी यांच्यापेक्षा ममतादीदी आघाडीस बांधून ठेवतील, असे काहींना वाटत आहे.
नवी दिल्ली : “दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( AAP ) यांना ‘अॅण्टी नॅशनल’ म्हणणार्या काँग्रेसने २४ तासांत माफी मागावी, अथवा त्यांची ‘इंडी’ आघाडीतून हकालपट्टी घडवू,” असा इशारा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी दिला आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वावर खुश असलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनाही आता राहुल गांधी नकोसे झाले आहेत. ‘इंडी’ आघाडीचे ( Indi Aghadi ) नेतृत्व ममता बॅनर्जी यांना देण्यास आपली हरकत नसल्याचे वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा घेराव सुरू केला आहे. सपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादीनंतर आता राजदने इंडी ( INDI ) आघाडीच्या नेतृत्वासाठी बैठक घेऊन एकमताने नेता निवडण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली : “दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू,” असे रविवार दि. १ डिसेंबर रोजी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal ) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दिल्लीतील त्यांनी ‘इंडी’ आघाडीला धक्का देत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपविरोधी इंडी आघाडीमध्ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र, सर्वच जागांवर भाज
नुकतेच भारताच्या वाढीच्या वेगावर जागतिक बँकेने पुनश्च शिक्कामोर्तब केले. ते केवळ वाढीच्या दराचे नसून, देशात राजकीय स्थिरता कायम राहणार आहे, याचेही द्योतक. भाजपला बहुमत न मिळाल्याने, केंद्रातील रालोआ सरकार धोरणात्मक सातत्य राखू शकणार नाही, देशात अस्थिरता माजेल, अशा वल्गना विरोधकांच्या ‘इंडी’ आघाडीने करायला सुरुवात केली होती. त्यालाच छेद देण्याचे काम या अहवालाने केले आहे.
नरेंद्र मोदी यांना आघाडी सरकार चालवण्यास काही अडचण येईल, असे वाटत नाही. अर्थात, आघाडी सरकार असो की एकाच पक्षाचे सरकार; त्यामध्ये कुरबुरी तर होतच असतात. त्यामुळे आघाडी सरकार आणि नरेंद्र मोदी हे समीकरणही यशस्वी होईल, असेच चित्र सध्या तरी दिसते.
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए २९७ जागांवर आघाडीवर असून बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडी आघाडीने २२७ जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक निकाल हा वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा अधिक चुरशीचा झालेला आहे. भाजपप्रणित एनडीएला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थानमध्ये २०१९ च्या तुलनेत नुकसान होत आहे. तर पाच राज्यांमध्ये भाजपनं आपली ताकद कायम राखली आहे.
एकीकडे काँग्रेसप्रणित इंडी आघाडी यंदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. त्याचवेळी इंडी आघाडीचे खंदे समर्थक असलेले योगेंद्र यादव यांनी मात्र पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे आकडे दिले आहेत. त्यामुळे भाजपविरोधकांचे विस्कळीत धोरण पुन्हा एकदा उघड झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये २०१० नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देऊन कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदार चपराक लगावली आहे. न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही, असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधान विरोधी चेहरा दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २३ मे रोजी दिली. ओबीसी, आदिवासी, दलित समाजाचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा कट भारतीय जनता पार्टी कदापि यशस्वी होऊ द
काहीही म्हणा, यावेळी शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. कशा बाबतीत म्हणताय? रडारड करण्याच्या बाबतीत. 4 जूनपर्यंतची प्रतिक्षाही न करता, त्यांनी मतदानाच्या दिवसापासूनच रडारड, चिडचिड, दोषारोप सुरू केलेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, त्यातही उद्धव यांच्यामध्ये सुधारणा आहे. इतर वेळेसारखे त्यांनी फुल टाईम टोमणे दिले नाहीत, तर दोषारोप केलेत. त्यांचा टोमण्यांकडून रडण्याचा प्रवास सुरू आहे. लोकांचे काय? त्यांच्या म्हणण्यावर काय जायचे म्हणा.
बिहारमध्ये मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. बिहारचे राजकारण हाताळणार्या भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मते, यंदाही बिहारमध्ये गतवेळच्या यशाची पुनरावृत्ती करणे शक्य आहे. नितीशकुमार सोबत असल्याने साहजिकच भाजपचे बळ वाढले आहे. त्याचप्रमाणे बिहारमधील अतिशय किचकट अशा सामाजिक समीकरणे सोडवण्यातदेखील भाजपला यश आले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला किती जागा मिळणार याविषयी इंडी आघाडीचे दोन प्रमुख नेते – अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांनी वेगवेगळे आकडे सांगितले आहेत. त्यामुळे इंडी आघाडीलाच आपल्या विजयाविषयी खात्री नसल्याची चर्चा रंगली आहे.
“मजबूत देश पाहिजे असेल, तर ‘मजबूर’ सरकार गरजेचे आहे. ‘मजबूर’ म्हणजे एकदमच ‘प्रॉब्लेमॅटिक’ नाही, पण ‘मिलीजुली सरकार’ गरजेचे आहे.” - इति आदित्य ठाकरे. एका डिजिटल वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंच्या युवराजाने दिलेली ही जाहीर कबुली. पण, एकट्या ठाकरेंचेच नव्हे, तर तमाम ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांच्या मनातलेच आदित्य ठाकरेंच्या ओठांवर आले एवढेच! ‘मोदीला सत्तेतून हटवायचे आहे,’ या एकाच राजकीय त्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना मग पंतप्रधान कोण असेल?
देशात व्होट जिहाद हवा की रामराज्य हवे, हे ठरविण्याची ही अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेश येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात व्होट जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे मतदारांनी ठरवायचे आहे. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की तिला दुसरे
इंडी आघाडीच्या गाडीमध्ये सगळे इंजिन आहेत. एकही बोगी नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ते सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. शनिवारी गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
२०२४ लोकसभा निवडणुकीतील तिकीट वाटप अखिलेश यादव यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. एक, दोन नव्हे तर सपाने अनेक जागांवर उमेदवार बदलले आहेत. काही जागांवर तर ३-३ वेळा उमेदवार बदलण्याची वेळ सपावर आली आहे. हा गोंधळ नेमंका काय आहे, हा प्रश्न अनेकांना पडत आहे. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही कोणत्या उमेदवाराचा प्रचार करायचा, याची चिंता सतावत आहे. ही समस्या केवळ एकाच ठिकाणी दिसली नाही, तर अखिलेश यादव यांना लोकसभेच्या अनेक जागांवर अशा समस्यांना तोंड द्यावे लागले.
तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते पिजूष पांडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल जातीयवादी टिप्पणी केली आहे. तेली जातीचे असलेले मोदी अयोध्येतील राम मंदिरात रामाचा अभिषेक कसा करू शकतात, असे पांडा यांनी म्हटले आहे. पांडाने पंतप्रधान मोदींच्या बालपणात चहा विकण्याबाबतही अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली होती.
आम आदमी पक्ष आणि त्याचे एकमेव नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही कारभाराची अधिक भयावह आवृत्ती बनण्याच्या प्रयत्नात आहेत. केजरीवाल यांची राजकारणात उतरण्यापूर्वीची वक्तव्ये आणि एक नेता म्हणून त्यांनी केलेले वर्तन हे भारतातील कसलेल्या भ्रष्ट नेत्यांनाही लाजविणारे. तुरुंगात जाईन, पण मुख्यमंत्रिपद सोडणार नाही, हे केजरीवाल यांचे वर्तन पाहून भ्रष्टाचारशिरोमणी लालूप्रसाद यादवही शरमिंदे झाले असतील; कारण त्यांनीही अटक झाल्यावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शुचिता दाखविली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, निवडणुकीमध्ये कौटुंबिक पक्षांना त्यांचेच एकेकाळचे चेले आव्हान देणार आहेत. ‘पीडीपी’ची साथ सोडून ‘जम्मू-काश्मीर अपनी पार्टी’ स्थापन करणारे सय्यद अल्ताफ बुखारी, काँग्रेसची साथ सोडून ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ घेऊन पुढे आलेले गुलामनबी आझाद आणि अॅडव्होकेट अंकुर शर्मा यांचे ‘एकम् सनातन भारत दल’ या पक्षांची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते.
नुकताच काँग्रेसचे युवराज खा. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात झाला. ‘इंडी’ आघाडीचे जवळपास सगळेच नेते या राजकीय रंगमंचावर उपस्थित होते. या न्याय यात्रेत राहुल गांधी यांनी काँग्रेसचे घोषणापत्रही जाहीर करून आश्वासनांचा अक्षरश: पाऊस पाडला. पण, बारकाईने गांधींच्या जाहीरनाम्यावर नजर टाकली असता, त्यामधील बहुतांश आश्वासनांची मोदी सरकारने आधीच पूर्तता केलेली दिसते. जसे की, राहुल गांधींनी असंघटित कामगारांसाठी ‘जीवन विमा योजना’ सुरू करण्याची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता इंडी आघाडीतील दोन मित्रपक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार डॉ. राजकुमार चब्बेवाल यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात दौरे करत आहेत. शुक्रवार, दि. १५ मार्च २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले आहेत. आपल्या तामिळनाडू दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारी येथे एका जाहीर सभेत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.
भाजपसमवेत झालेल्या युतीमुळे तेलुगू देसम, जनसेना या पक्षांचाही लाभ होईल, अशी चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशातील विद्यमान जगनमोहन सरकारविरूद्ध कमालीची नाराजी असल्याने त्याचा फटका त्या पक्षास बसेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडाला असून, प्रचाराचा नारळही फुटला आहे. भाजपने एकीकडे १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून रणनीतीक आघाडी घेतलेली दिसते, तर दुसरीकडे ‘इंडी’ आघाडीचे जागावाटप रखडलेलेच. आता निवडणूक म्हटल्यावर, राजकीय वार-प्रतिवार हे ओघाने आलेच. पण, हल्लीच्या राजकीय भाषणबाजीत विचारधारा, विकासकामांपेक्षा वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि हेवेदाव्यांवरच नेतेमंडळी घसरताना दिसतात.
मार्क्सवाद्यांच्या गुंडशाहीला कंटाळलेल्या बंगाली जनतेने तृणमूल काँग्रेसला सत्तेवर बसविले खरे, पण केवळ सरकारच्या नावात बदल होण्याखेरीज राज्यातील परिस्थितीत कसलाच गुणात्मक बदल घडला नाही. उलट बंगालची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. तरीही या बेबंदशाहीविरोधात कोणा लेखकांनी आपले पुरस्कार परत केले नाहीत की, कोणा चित्रपट कलाकाराला तेथे राहण्याची भीती वाटत नाही! ‘इंडी’ आघाडीतील सर्वच पक्षांनी मौन पाळून आपला खरा चेहरा यानिमित्ताने जनतेपुढे आणला आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने 'अबकी बार चारशे पार'चा नारा दिला आहे. दुसरीकडे, देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बनवलेली इंडी आघाडी शेवटची घटका मोजत आहे. भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थापन झालेल्या विरोधी आघाडीला घटक पक्ष एक-एक करून सोडत आहेत.
"काँग्रेस कुणालाही रोखण्याचा प्रयत्न करत नाही, इंडी आघाडी जेव्हापासून बनली तेव्हापासून गंभीर आजारांनी ग्रस्त आहे. सुरुवातीपासूनच त्यात विविध प्रकारचे विषाणू आले, नंतर ते आयसीयूमध्ये गेले आणि शेवटी ते व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर काल नितीश कुमार यांनी तर अंत्यसंस्कार केले. आता इंडी आघाडीचे काय होणार?" असे वक्तव्य काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. आपल्या विधानातून त्यांनी काँग्रेसवर आणि इंडी आघाडीवरच निशाना साधला आहे.
सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सनातन हिंदू धर्माबद्दलची त्यांचे मत तुम्हाला मान्य आहेत का? हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे.
तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.
२३ जून २०२३ ला बिहारच्या राजधानीमध्ये देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे पोस्टर्स लागले होते. कारण होत, पाटनामध्ये होणारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक. बैठक झाली केजरीवाल रुसले. पण पुढच्या बैठकीची तारीख ठरली. यानंतर एका महिन्याच्या आत विरोधी आघाडीची दुसरी बैठक बंगलोरमध्ये पार पडली, या बैठकीत या विरोधी आघाडीचे नावं पण ठरले, इंडी आघाडी. यानंतर अवघ्या दीड महिन्यात इंडी आघाडीची तिसरी बैठक पार पडली, मुंबईत. या बैठकीत विशेष काही घडलं नाही. पण एक समन्वय समिती जाहीर झाली.
भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडी आघाडी एकत्र आली आहे. मात्र, पहिल्या तीन बैठकांमध्ये इंडि आघाडीतील सहकार्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. केवळ मोदी विरोधासाठी तयार झालेल्या इंडी आघाडीची पहिलीवहिली सभादेखील रद्द करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही सभा होणार होती. रविवारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांनी ही सभा रद्द झाल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले. दरम्यान, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत भोपाळमध्ये
विरोधकांच्या इन्डी आघाडीने देशातील काही नामांकित पत्रकारांवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या हुकुमशाही व राजेशाही वृत्तीचे प्रतिक असून याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनता त्याच्या या प्रवृत्तीला नक्कीच उत्तर देईल, असे ते म्हणाले. बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, आणीबाणीच्या काळातही असेच झाले होते. पत्रकारितेवर बंधने लावणे हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे.