"आरोग्य आणि शिक्षण या समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी आवश्यक आहे, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी निरोगी शरीर आवश्यक आहे. दुर्दैवाने, आज चांगले आरोग्य व दर्जेदार शिक्षण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पूर्वी हे सेवा कार्य मानले जात होते, परंतु आता आरोग्यसेवा व शिक्षण हे दोन्हीही व्यापारी उपक्रम झाले आहेत. शिक्षणाला पूर्वी पवित्र कर्तव्य मानले जात होते, पण आज समाजात मोठा बदल झाला आहे. तरीही शिक्षकांनी हे भान ठेवले पाहिजे की अध्यापन हे त्यांच्या आयुष्याचे उत्तरदायित्वच राहिले पाह
Read More
समरसता साहित्य संमेलनात विचारवंतांची उपस्थिती; समाजप्रबोधनावर भर "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात २२ एप्रिल ते १७ जून २०२५ दरम्यान कोणताही संवाद झालेला नाही, हे विरोधकांनी आपले कान उघडे ठेवून ऐकावे; असा घणाघात परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी राज्यसभेत केला आहे.
"बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर ही स्थळं वीरशैव लिंगायत समाजासाठी श्रद्धास्थान आहेत. शक्ती देवीची भक्ती आणि बसवेश्वर, सिद्धराम या शिवशरणांबद्दल असलेली निष्ठा हे दर्शवते की वीरशैव लिंगायत हिंदूच आहेत," असे स्पष्ट प्रतिपादन महादेव शिवाचार्य महाराज (वाईकर) यांनी केले.
दावणगिरी येथे दि. २१ जून रोजी अखिल भारतीय वीर शैव महासभेचे आयोजन केले होते. त्यावेळी समाजाचे पाचही जगद्गुरु एकत्र एका व्यासपीठावर आले. सर्वच जगद्गुरु यांनी वीरशैव लिंगायत हे सनातन धर्माचाच भाग आहे असे सांगितले. श्रीशैलजगद्गुरु यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की वीरशैव आणि लिंगायत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसेच त्यांनी वीरशैव लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक भाग आहे असे या संमेलनामध्ये जाहीर केले. श्रद्धेय रंभापुरी जगद्गुरु महास्वामीजीनी वीरशैव लिंगायत मधील वेगवेगळ्या जाती हे यामध्ये फरक न करत
आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दूरदृष्टी, कार्यक्षम निर्णयक्षमता आणि निष्ठावान नेतृत्वाचे प्रतीक ठरलेले, महाराष्ट्राचे जनप्रिय मुख्यमंत्री आणि माझ्या आयुष्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस. या विशेष दिनानिमित्त त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने गौरव व्यक्त करणे, हे माझे कर्तव्य आहे. माझ्या आयुष्यात देवेंद्रजी यांचे स्थान फार मोठे आहे. ते माझे गुरू आहेत. माझ्या सार्वजनिक जीवनातील आदर्श आहेत.
वीरशैव लिंगायत समाजाच्या आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक ठसा आणि तत्त्वज्ञानाचा जागर करणारा भव्य समाजमेळावा २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. हिंदू वीरशैव लिंगायत मंच सातारा वतीने समर्थ मंदिरातील दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे हा विशेष कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार आहे.
‘संगीत सौभद्र’ या नाटकामधील ‘कोण तुजसम सांग या मज गुरुराया’ या नाट्यपदामध्ये, गुरू शिष्याची कशी तयारी करून घेतो आणि त्यावर पूर्ण कृपाही कशी करतो, याचे यथार्थ वर्णन आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही शिष्य तयार झाला की गुरू पूर्ण कृपा करतात, असेच म्हटले. गुरू शिष्याच्या नात्याचा नुकत्याच संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा...
सुशील शिंदे यांच्या जीवनात एक काळ असा होता, जेव्हा शिक्षण, सुरक्षितता आणि भविष्याची दिशा या सगळ्या गोष्टी अंधारात हरवलेल्या होत्या. त्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हात मिळाला, तो ‘गुरुकुलम्’ या संस्थेचा आणि गिरीश प्रभुणे काकांचा! प्रभुणे काकांनी उभा केलेला ‘गुरुकुलम्’ प्रकल्प केवळ एक शाळा नाही, तर माणुसकीचं घर, संस्कारांची शाळा आणि आत्मविश्वास देणारं स्थान आहे. विशेषतः भटक्या-विमुक्त समाजातील आणि पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ही चळवळ उभी केली.
युरोपीयन राष्ट्र हंगेरी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुडापेस्टच्या भारतीय दूतावासातील अमृता शेर-गिल सांस्कृतिक केंद्रात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सांस्कृतिक केंद्रातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल आणि भावपूर्ण कला सादरीकरणांनी सर्वांचे मन जिंकले. या सादरीकरणांमधून त्यांच्या कला-साधनेप्रती असलेली निष्ठा आणि गुरूविषयी असलेली भक्ती स्पष्टपणे दिसून आली.
गुरुग्राममध्ये पडलेल्या पावसाने रस्ता खचून बुधवार दि. ९ जुलै रात्री दारूने भरलेला एक मोठा ट्रक खड्ड्यात पडल्याची घटना उघडकीस आली आहे. पेरिफेरल रोडवर रात्री १०:३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने या परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, ही सनातन संस्कृतीतील एक अत्यंत पावन पर्वणी मानली जाते. अखिल मानवसमाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी अनंत वेदराशीचे चार शाखांमध्ये विभाजन केले, पुराणे व महाभारत अशा लोकोत्तर ग्रंथांना शब्दबद्ध करून एक शाश्वत ज्ञानदीप प्रज्वलित केला, त्या महर्षी वेदव्यासांचे तसेच त्यांचे पाईक असणार्या समग्र गुरुपरंपरेचे पूजन आजच्याच दिवशी केले जाते. समाजाला शाश्वत कल्याणाचा मार्ग दाखविणार्या ‘गुरु’तत्त्वाविषयीची भक्ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपल्या पूर्वसूरींनी आजच्या या दिनविशेषाची योजना
“ विद्यार्थी ज्यावेळेस गुरुकडे एखादी गोष्ट शिकायाला जातो, तेव्हा संपूर्ण शरणागतीच्या भावनेने त्याने जावं. गाण्याच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की गुरुला शरण गेल्याशिवाय संगीत साधना अशक्य आहे.” असे मत सुप्रसिद्ध व्होयलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी आपल्या सांगितीक प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की “ मी ज्या मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले, मग ते पंडिचत बी.एस. मठ गुरुजी असतील, दातार गुरुजी असतील, किश
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी रामानंदी पंथाच्या प्राचीन पाताळपुरी मठात १५१ मुस्लिम महिला व पुरुषांनी गुरुदीक्षा घेतली. वाराणसी येथे यासंबंधीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेव्हा पातालपुरी मठातील जगद्गुरू बालकदास महाराज यांच्याकडून ही गुरुदीक्षा घेण्यात आली. अशी माहिती आहे की, दरवर्षी काही मुस्लिम बांधव येथे येतात आणि गुरुदीक्षा घेतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, गुरुपौर्णिमा हा गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा सर्वात मोठा दिवस आहे. यामुळे गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते अधिक दृढ होते.
गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभरात 'गुरु पौर्णिमा उत्सव' साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आ. श्रीकांत भारतीय यांची 'गुरु पौर्णिमा' प्रदेश संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.
पंढरपूरच्या वारीत हजारो वारकऱ्यांसोबत चालत, भजन गात, टाळ मृदंगाच्या तालावर नाचत जेव्हा एखादी तरुणी भक्तिरसात न्हालेली दिसते, तेव्हा ती केवळ एक अभिनेत्री राहात नाही ती त्या 'वारी'चा एक अविभाज्य भाग होऊन जाते. 'सैराट' मधून घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिने यंदा आषाढी वारीत सहभागी होत स्वतः अनुभवलेली भक्ती, समर्पण आणि अध्यात्माची नितांतसुंदर झलक स्वतःच्या जीवनात जोपासली.
भारतीय संस्कृती आणि भारतीय विचारदर्शनाचे वेगळेपण म्हणजे जीवनाकडे बघण्याचा समग्र दृष्टिकोन. मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून मानवी जीवनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांचा शोध या प्रक्रियेतून सुरू असतो. या समग्रतेचा विचार करताना मनात येणारा पहिला विचार म्हणजे योग. योग याचा अर्थ केवळ विशिष्ट व्यायामाची पद्धत असा होत नाही. कारण, योगाबद्दल बोलताना आपण ‘योगसाधना’ असा शब्दप्रयोग करतो. योग ही एक जीवनशैली आहे, म्हणूनच हे तत्त्वज्ञान शाश्वत आहे. चिरकाळ टिकणारे आहे. भारताने जगाला संस्कृतीचा जो सगुण संपन्न वारसा दिला, त्यातील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात दर्शन घेतले. तसेच याच परिसरातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मंदिरात श्री गणेश पूजन, कलश पूजन, पाद्य पूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बळीराजा सुखी राहावा, सर्व नागरिकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा उंच
(Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
अधिकाधिक आध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवामार्ग देश आणि समाजाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे असे अभिवचन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी दिले.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ आणि पोस्टर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो सिख धर्मगुरु श्री गुरु नानक यांच्या रूपात दिसतो. या पोस्टरमध्ये 'लवकरच ट्रेलर येणार' अशी देखील घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अनेकांनी हा आमिरचा आगामी चित्रपट समजून चर्चा सुरू केली. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
देशात सध्या दलित हिताच्या नावाखाली काही घटक समाजात तेढ पसरविण्यात आघाडीवर आहे. अशा घटकांचा अजेंडा वेळीच ओळखणे आवश्यक आहे, असे मत लेख आणि कायद्याचे अभ्यासक गुरूप्रसाद पासवान यांनी शनिवारी व्यक्त केले.
Khalistani terrorists कॅनडामध्ये व्हँकुव्हरमधील एका प्रसिद्ध असणाऱ्या गुरूद्वारावर काही खलिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्याच रात्री गुरूद्वारावर भारता विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. व्हँकुव्हरच्या एका हिंदू मंदिरांच्या भिंतींवर भडखाऊ घोषणा नमूद करण्यात आल्या होत्या. आरोप आहे की, काही दिवसांआधी गुरूद्वारावर खलिस्तान्यांनी नगर किर्तनात सामिल होऊ दिले गेले नाही, यानंतर ही घटना घडली आहे.
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून होत असलेल्या फसवणूकीप्रकरणी मुख्यमंत्र्याशी चर्चा करून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करू, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ एप्रिल रोजी दिली.
( Deputy Chief Minister Shinde on Receiving Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj award ) ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Gurusidat Singh पंजाबमधील अमृतसरमध्ये ठाकुरद्वारा मंदिरावर नुकत्याच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील मुख्य आरोपीला सोमवारी सकाळी पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत ठार करण्यात आले. गुरुसिदत सिंग असे या संशयिताचे नाव असल्याची माहिती समोर आली. त्याला आता पंजाब पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गोळी लागली आणि नंतर तो रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. त्याचा साथीदार विशालला पळून जाण्यात यश आले. ही घटना १५ मार्च रोजी खंडवालातील मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी घडली.
गरजवंतांचे तारणहार होत दैवी अनुभूती देण्याचं काम अनेक महान अध्यात्मिक गुरूंनी आजवर केलं आहे. ज्यांनी आपल्या जीवनात आयुष्यभर तपसाधनेत मग्न राहून तपचर्या केली आणि भक्तांची दुःखे निवारण केले असे सद्गुरू भालचंद्र महाराज ही देवत्व प्राप्त केलेली महान अनुभूती. त्यांच्या कृपेची प्रचिती आजही असंख्य भाविकांना येते. योगियांचे योगी, असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या परमहंस भालचंद्र महाराज यांचा जीवनप्रवास आता मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. कणकवली मध्ये नुकत्याच भालचंद्र महाराज यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त, निर
ध्यान, प्राणायाम, वेगवेगळ्या मुद्रा, घरातील संस्कारांच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालत, युवा पिढी घडवणार्या रुपेश बाविस्कर यांच्याविषयी...
Khalistan समर्थकांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ रोजी कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये भारतीयांविरोधात निदर्शने करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करणारे पोस्टर्सही लावले होते. दरम्यान खलिस्तानचे झेंडे घेऊन आलेल्या या आंदोलकांनी पंजाबला भारतापासून वेगळे करा, अर्थातच पुन्हा भारताच्या फाळणीसाठी त्यांनी मागणी केली.
शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंह ( Guru Govind Singh ), हे थोर योद्धे, दार्शनिक चिंतक लेखक आणि संगीत मर्मज्ञ कवी होते. महाराष्ट्रातील नांदेड येथे त्यांचे बलिदान स्मारक, गुरूद्वारा आहे. त्यांच्या नावावर अनेक काव्यग्रंथ आहेत. प्रभु रामचंद्राविषयी त्यांच्या मनी विशेष श्रद्धाभाव होता. त्यांचा ‘२४ अवतार’ नावाचा ग्रंथ सर्वपरिचित आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यग्रंथ म्हणजे ‘रामावतार’ होय. गोविंदसिंह यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी इ. स. १६९८ साली त्यांनी, सतलज नदी किनारी नैना देवी परिसरात ‘र
आयुर्वेदात ( Key to Health ) सांगितलेल्या वात, पित्त, कफ त्रिदोषांविषयी आपल्याला बरेचदा ऐकून, वाचून प्राथमिक माहिती असते. कारण, हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांसाठी कारणीभूत असतात. तेव्हा या तिन्ही दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे थोडक्यात ‘प्रकृति परीक्षण’ होय. प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक
प्रयागराजमध्ये भरणारा कुंभमेळा ( Prayagraj Kumbhamela ) उधळून लावण्याचे विधान खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवंत पन्नू याने केले आहे. कुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्व पंथ, संप्रदाय आणि साधूंना एकत्र आणणारा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव. प्रयागराजमधील कुंभमेळ्याला हजारो वर्षांची परंपरा असून, हा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक एकतेचा महान प्रतीक आहे. सनातन हिंदू धर्मातील विविध परंपरांमध्ये विविधता असूनही, कुंभमेळा सर्व पंथांना एका सूत्रात बांधतो. मात्र, गुरुपतवंत पन्नूचे विधान म्
आप्तस्वकीयांचे डोळ्यासमोर हाल होताना पाहून देखील ज्यांची मातृभूमी आणि धर्मावरची श्रद्धा जरा देखील कमी झाली नाही, उलट अध्यात्मशक्ती आणि क्षात्रतेजाचा अपूर्व संगम करत त्यांनी अन्यायी औरंगजेबाच्या राजवटी विरोधातले धर्मयुद्ध अविरत सुरु ठेवले, त्या श्री गुरुगोविंदसिंह ( Gurugovindsingh ) यांच्या प्रकाश दिनानिमित्त त्यांच्या साहित्यसंपदेतील वीररसयुक्त पत्र जफरनामाचा हा भावानुवाद...
'सैराट' चित्रपटातून अवघ्या एका रात्रीत स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. आत्तापर्यंत तिने ‘कागर’, ‘मेकअप’, ‘झिम्मा २’ या मराठी तर ‘२०० हल्ला हो’ (२०२१), ‘अनकहीं कहाँनिया’ (२०२१), ‘झुंड’ (२०२२), या हिंदी चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. रिंकूने ‘मनसू मल्लिगे’ या सैराटच्या कन्नड भाषेतील रिमेकमध्येही काम केले असून विविध भाषांत काम करून तिने स्वत:च्या अभिनयाची छाप सोडली आहे. दरम्यान, लवकरच आशा वर्कर्सच्या जीवनावर आधारित चित्रपटात ती झळकणार असून या चित्रपटाची न
मुंबई : “एक भारत, श्रेष्ठ भारत’ हे सर्वश्रुत आहेच. भारताचा ( India ) वारसा आणि विकास यांचा समन्वय साधून पुढे जाण्याचे व्हिजन पंतप्रधान मोदीजींनी भारताला दिले. त्यास मजबूतीने आपल्याला पुढे न्यायचे आहे. तरच भारत विश्वगुरु म्हणून पुढे येईल,” असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
ह्म, विष्णु आणि महेश या तीन देवांचा अंश असणाऱ्या श्रीगुरुदेवदत्त यांची आज जयंती. ( Datta Jayanti ) दत्त कथांविषयी आनी त्यांच्या अवतारांविषयी आपण आजवर बरचं ऐकलेलं आहे. आपल्या देशात दत्तांची अनेक मंदिरे आहेत आणि त्यांच्या अवतारांशी निगडीत अनेक स्थानं आहेत. पण त्यापैकी २४ स्थानं अशी आहेत ज्यांची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेला दत्त परिक्रमा म्हटलं जातं.
ठाणे : कारगिल युद्धाला ( Kargil War ) यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून ‘कारगिल-द टेल्स ऑफ वेल्लर’ या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. ’शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आनंद विश्व गुरुकूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आपला नाविन्यपूर्ण डिजिटल रोड सेफ्टी लर्निग प्लॅटफॉर्म ई-गुरूकुल लाँच केला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी याची प्रमुख उपस्थित होते. हा उपक्रम भारतातील रस्ता सुरक्षिततेच्या संस्कृतीला चालना देण्याप्रती एचएमएसआयच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो.
'सैराट' चित्रपटामुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु 'झिम्मा २' या चित्रपटातून झळकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बऱ्याच काळानंतर ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजसत्तेच्या चाव्या महायुतीच्या ताब्यात देताना, नागरिकांनी भरभरून मतदान केले. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातील मतदानही विक्रमी झाले. निवडणूक म्हटली की, अनेक डावपेचांची जशी चर्चा असते, तशीच ती काही पॅटर्न्सचीदेखील असते. राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील असेच अनेक ‘पॅटर्न’ पहायला मिळाले. त्यांपैकीच एक नवीन पॅटर्न म्हणजे ‘धारकरी पॅटर्न’ ( Dharkari pattern ) होय. या पॅटर्नने अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची चव चाखली आहे, तर काही पडणार्या हिंदूनिष्ठांच्या जागा निवडून दिल्याची चर्चा आ
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी राज्यातील ठाणे येथील गुरूद्वारात गुरूनानक जयंती दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना आणि भाजप सदस्यांना गुरूद्वारात पाठवण्यात आले, असे ट्विट केले. यावरून धुमाकूळ घालण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, गुरूद्वारामध्ये सर्व समान आहे. सर्वांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असे त्यांनी लिहिले.
Gurupawant Singh Pannoon उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीराम मंदिर यांच्या जन्मभूवीवर खलिस्तानी दहशतवादी गुरूपवंत सिंह पन्नून यांने अलीकडेच अयोध्येत बांधलेले राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. अयोध्येत राम मंदिरात १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी हिंसाचार होईल, असा व्हिडिओ पन्नून याने जारी शेअर केला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुप्रसाद यांचा रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्दैवी अंत झाला. बंगळुरू येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असा अंदाज आहे. ‘एडेलू मंजुनाथ’ आणि ‘डायरेक्टर्स स्पेशल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन गुरुप्रसाद यांनी केले.
डॉ गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचा "पाडवा पहाट" जुहू येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ ऋचा रत्नपारखी, डॉ शशांक शाह , डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग अणि गायक सुखविंदर सिंग यांच्या शुभ हस्ते झाले. ४०० पेक्षा जास्त डॉक्टर परिवारांनी ह्यात सहभाग घेतला. कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेत अत्यंत सुंदर आणि सामाजिक संदेश असणार्या रांगोळींना पारितोषिक दिले गेले. त्यात ६ वर्षाच्या मुलीं पासून ७५ वर्षाच्या आजींनी भाग घे
(Gurukrupa Heart Foundation) गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे, विश्वस्त डॉ. गजानन रत्नपारखी अणि डॉ. स्मृती रत्नपारखी यांच्याकडून रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दहेजे ( ता. विक्रमगड, जि. पालघर ) ह्या गावामध्ये जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात ३०० आदिवासी गरीब गरजू लोकांना ब्लँकेट अणि चादरचे वाटप करण्यात आले .ह्या भागामध्ये खूप थंडी पडते, त्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विदेशात राहून भारताला आव्हान देण्याचे प्रयत्न काही जणांकडून होत आहेत. खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसचा अतिरेकी गुरपतवंत सिंह पन्नू याने भारताविरोधात गरळ ओकली आहे. पन्नूनने एक व्हिडिओ शेअऱ करत त्यात देशातील काही राज्य भारतापासून दुभंगली जावी यासाठी मोहिम करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी चीनला भारतावर आक्रमण करण्याचा सल्ला दिला आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेते गुरुचरण सिंग दोन महिन्यांपूर्वी कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. त्यानंतर तब्बल २६ दिवसांनी ते परत आले होते. घर संसाराला कंटाळल्यामुळे एकांतवासात काही दिवस घालवायचे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता घरी परतल्यानंतर मुंबईत ते काम शोधत आहेत.
शिक्षकांना घाबरून शाळेत जायला तयार न होणारी मुले आपण अनेकदा आजूबाजूला पाहतो; पण शिक्षकांनी फक्त एक फोन केल्यावर मुले शाळेत येऊ लागली तर...? शिक्षकांच्या एका फोनवर लगेच शाळेची वाट धरणार्या अशाच मुलांची गोष्ट आपल्यासमोर मांडतो, ‘गुरुजीचा फोन’ हा लघुपट. दि. 6 जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा लघुपट माध्यमांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तेव्हा, उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या काळातील गुरु-शिष्य संबंधांचे अनोखे दर्शन घडविणार्या या लघुपटाविषयी...
जागतिक परिस्थितीत भारताला परमवैभवाप्रती नेण्याची शपथ घेतलेला एक नेता वेदांत व प्राचीन संस्कृतीचे आधुनिक काळाला अनुसरून पुनरुत्थान करण्यासाठी कटिबद्ध झाला असल्याने जग आज भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे.
महाड : सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘जीवनविद्या फाऊंडेशन, मुंबई’ व ग्रामपंचायत वरंध, ता. महाड, जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सविता ऑईल टेक्नोलॉजिस लि.’ यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून ग्रामसमृद्धी अभियानाचे भव्य उद्घाटन नुकतेख संपन्न झाले.