डॉ. रत्नपारखींच्या गुरुकृपा हार्ट फाउंडेशनच्यावतीने दिवाळी स्नेहसंमेलन.
गायक सुखविंदर सिंग आणि दै. मुंबई तरुण भारत संपादक किरण शेलार यांची प्रमुख उपस्थिती
03-Nov-2024
Total Views | 135
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दै. मुंबई तरुण भारतची नागरिकांना साद.
मुंबई :डॉ गजानन रत्नपारखी यांच्या गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनचा "पाडवा पहाट" जुहू येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ गजानन रत्नपारखी, डॉ स्मृती रत्नपारखी, डॉ प्रांजळ रत्नपारखी. डॉ ऋचा रत्नपारखी, डॉ शशांक शाह , डॉ राम चव्हाण , डॉ काटे, डॉ अशोक सिंग अणि गायक सुखविंदर सिंग यांच्या शुभ हस्ते झाले. ४०० पेक्षा जास्त डॉक्टर परिवारांनी ह्यात सहभाग घेतला. कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेत अत्यंत सुंदर आणि सामाजिक संदेश असणार्या रांगोळींना पारितोषिक दिले गेले. त्यात ६ वर्षाच्या मुलीं पासून ७५ वर्षाच्या आजींनी भाग घेतला होता.
श्रेयस पाटकर ह्यांच्या " कशिश" ऑर्केस्ट्रा द्वारे सुमधुर संगीताचा कार्यक्रम झाला. वयाचे भान विसरून अनेक डॉक्टर्स संगीताच्या तालावर थीरकले. लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील झाली आणि सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली.बेस्ट ड्रेस कपल, बेस्ट ड्रेस महिला, बेस्ट ड्रेस पुरुष अशी अनेक बक्षीसे देण्यात आली. डॉ स्मिता पाटील यांनी "ती फुलराणी" एकपात्री प्रयोगाची एक झलक सादर केली अणि प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. कार्यक्रमाला दैनिक मुंबई तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक किरण शेलार ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुज्ञ आणि जागरूक नागरिक म्हणून आपण लोकशाहीच्या सर्वोच्च उत्सवामध्ये सहभागी होऊन सर्वानी १००% मतदान करा असे आवाहन किरण शेलार यांनी केले. आपल्या संबोधन दरम्यान किरण शेलार यांनी सर्व उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शेलार यांच्या सोबत दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख आणि हाऊसिंग फेडरेशन संचालक डॉ. विशाल कडणे उपस्थित होते. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी अंधेरी विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरजी पटेल उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ राम चव्हाण आणि डॉ अश्विनी चव्हाण , डॉ शशांक शाह, डॉ दीपाली अणि डॉ गजानन काटे डॉ अशोक सिंघ , डॉ शरद दधीच , डॉ समीर पाटील , डॉ स्मिता पाटील , डॉ प्रियंवदा शर्मा, डॉ मोना गांधी ,डॉ शिल्पा बन्सल ह्यांची मोलाची मदत अणि साथ लाभली. या कार्यक्रमांमध्ये एकत्र येऊन लोकांनी आपापसातील नातेसंबंध अधिक दृढ केले आहेत. दिवाळीच्या या विशेष कार्यकमामुळे लोकांना एकत्र येण्याची, आनंद साजरा करण्याची संधी मिळाली असे आयोजक डॉ गजानन रत्नपारखी यांनी सांगितले.