ठाणे : काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) यांनी राज्यातील ठाणे येथील गुरूद्वारात गुरूनानक जयंती दिवशी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रचार करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांना आणि भाजप सदस्यांना गुरूद्वारात पाठवण्यात आले, असे ट्विट केले. यावरून धुमाकूळ घालण्यात आला आहे. त्यांनी लिहिले की, गुरूद्वारामध्ये सर्व समान आहे. सर्वांच्या भावनांचा आदर केला पाहिजे असे त्यांनी लिहिले.
मात्र, या दाव्याबाबत गुरूद्वाराचे श्री दशमेश दरबारचे अध्यक्ष गुरूमुख सिंह स्यान यांनी स्पष्ट विधान केले आहे. निवेदनानुसार, जेपी नड्डा जी गुरू ग्रंथ साहिबा यांच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी पूर्ण भक्तीभावाने गुरू नानाक यांच्या चरणी नतमस्तक झाले. गुरूद्वार व्यवस्थापन करणाऱ्यांनी नड्डा यांना आत थांबत दर्शन करण्यासाठी विनंती केली. निवेदनात म्हटले की, नड्डा यांनी इतर भक्तांप्रमाणेच गुरूद्वाराला पूर्ण आदराने भेट दिली गेली आणि कोणताही निवडणूक प्रचार केला नाही.
गुरूमुख सिंह म्हणाले की, नड्डा यांनी गुरूद्वाराच्या प्रतिष्ठेचे आणि नियमांचे त्यांनी पालन केले. काही माध्यमांनी जेपी नड्डांबाबत विपर्यास केला आणि नड्डा हे प्रचारासाठी गुरू नानकजींच्या नतमस्तक झाल्याचा खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
पत्रकारांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचे गुरूद्वारा समितीने स्पष्ट केले. शिवाय अशा खोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका असे आवाहन त्यांनी भाविकांना केले आहे.