हल्लीचा जमाना हा ऑनलाईन खरेदीचा. तरीही ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांचे हक्क, अधिकार यांच्याविषयीची जागरुकता अभावानेच दिसून येते. पण, ई-कॉमर्सच्या युगात ग्राहकांनी खरेदी करताना खबरदारी घेण्याबरोबरच, आपले हक्क समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे. आज ‘जागतिक ग्राहक दिना’निमित्ताने याबाबतचा घेतलेला सविस्तर आढावा...
Read More
‘सहकार बिना नहीं उद्धार’ या वचनाला जागत नागरिकांच्या गरजा भागवून ‘डोंबिवली मध्यवर्ती सहकार भांडार’ या संस्थेला विकासाकडे नेण्याचे काम नि:स्वार्थीपणे आजवर कार्यकत्यांनी केले. त्यांच्या या कार्यावर आजच्या ‘जागतिक ग्राहक दिना’च्या निमित्ताने प्रकाश टाकणारा हा लेख...
ग्राहक म्हणून कायम जागरूक आणि सतर्क राहणे आवश्यक आहे, असा सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. मंगळवार, २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राज्यातील नागरिकांना काही सूचना दिल्या आहेत.
सौदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रातील कंपनी मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड नवा खुलासा केला आहे. संयुक्त अरब अमिराती(युएई)मध्ये कंपनीच्या मालकीची कुठलीही मालमत्ता नाही असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.
मामाअर्थ कंपनीची उपकंपनी होनसा कनज्यूमर लिमिटेड (Honasa Consumer Limited) कंपनीने कोसमोजेनेसिस लॅब्स (CosmoGenesis Labs) या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. तशी माहिती कंपनीने दिलेली आहे. भारतीय ग्राहकांच्या सेवेत आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. या कंपनीचे The Derma co, Aqualogica, Dr Sheths ही कंपनीची पर्सनल केअर उत्पादने आहेत.
जागतिक घडामोडींचे साहजिकच भारतीय अर्थव्यवस्था, बाजारपेठेवर चांगले-वाईट परिणाम दिसून येतात. अमेरिकन ‘कनझ्यूमर प्राईज इंडेक्स’ (सीपीआय) अर्थात ग्राहक महागाई निर्देशांकात घट झाल्याचे आकडे नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यानिमित्ताने अमेरिकेच्या घटत्या महागाईच्या आलेखाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, बाजारपेठेवर नेमका काय परिणाम जाणवू शकतो, याचा परामर्श घेणारा हा लेख...
रिझर्व्ह बँकेने सोमवारी ' Inflations Expectations Survey of Households' व 'Consumer Confidence Survey 'या दोन अहवालाचे अनावरण केले आहे.या अहवालातून दोन महिन्यातील पतधोरणाचा आढावा मिळणार आहे.
अनेक चॉकलेट्समधील लिड, कॅडमियम मधील प्रमाणाबाबत एका ग्राहक अहवालाने चिंता व्यक्त केली आहे. चॉकलेट कंपनी ' Hershey' ला चॉकलेट मधील जड धातूंचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला या अहवालात दिला गेला आहे. विना नफा (Non Profit) ग्राहक संघाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे ४८ पैकी १६ चॉकलेट उत्पादनात मोठ्या प्रमाणात लीड, कॅडमियम आढळून आल्याने हे प्रमाण कमी करण्याची शिफारस यात केली आहे. डार्क चॉकलेट बार, मिल्क बार, कोकोआ पावडर, चॉकलेट चिप्स, ब्राऊनीज, चॉकलेट केक, हॉट चॉकलेट या सात वर्गातील चॉकलेटचे सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्
ग्राहकाकडून पिशवीचे पैसे घेणे बंगरुळूमधील एका कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. कंपनीने ग्राहक महिलेकडून आपला लोगो असलेल्या पिशवीचे २० रुपये घेतल्याने तिने ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने कंपनीला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
"ग्राहकांच्या समस्यांबाबत ग्राहक पंचायतीने केलेल्या कामाच्या अनुषंगाने आपण 'सुवर्णमहोत्सवी वर्ष' न म्हणता आपण यास 'सुवर्ण वर्ष' असेही म्हणू शकतो. ग्राहकांच्या समस्यांवर काम करणारे यापूर्वीसुद्धा होते. परंतु ग्राहकांच्यादृष्टीने आर्थिक जगताचा विचार करणारी ग्राहक पंचायत ही पहिली संस्था आहे. या संस्थेने ग्राहकांच्या हिताकरीता काम करण्यासाठी सरकारला महत्त्वपूर्ण पाठबळ दिले.
बिकानेर मधील एका चाळीतून सुरू झालेला ' हल्दीराम ' चा प्रवास उल्लेखनीयच नाही तर अभूतपूर्व आहे. आज स्नॅक्स पासून भुजिया पर्यंत, स्वीटस पासून शीतपेयापर्यंत पसरलेले साम्राज्य तितक्याच ताकदीने मार्केट मध्ये उभे आहे. १९१९ मध्ये वडिलांचा व्यवसायातील यश पाहून हल्दीराम ( गंगा बिशन अग्रवाल) यांनी मेहनतीने १९३७ साली एक आलुभुजियांचे दुकान सुरू करण्याचे ठरवले. प्रथमदर्शनी हे काम आव्हानात्मक होते. याबद्दल फारशी कल्पना समाजात रूढ नव्हती. परंतु आपल्या बेसनयुक्त आलुभुजियाने लोकांना अक्षरशः वेड लावले. हळूहळू एकाची चार दु
कांदा आणि टोमॅटोच्या वाढत्या दरांवर अंकुश लावण्याकरिता केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडून बफर स्टॉक खरेदी करण्याची तयारी केली आहे. दरम्यान, केंद्र सरकार देशातील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांकडून कांदा आणि टोमॅटो यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. परंतु. हवामानाचा फटका खरीप हंगामाला बसला असून या दोन्ही पिकांचे उत्पादन अत्यल्प प्रमाणात झाल्याने मागणी वाढून किंमतीदेखील वधारल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या वाढत्या भाववाढीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारकडून बफर
ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीएफसी) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारपेठांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल.
नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे होत असलेले उल्लंघन लक्षात घेऊन, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए)मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करणाऱ्या, आघाडीच्या पाच ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉपक्लूज आणि मिशो या पाच ई – कॉमर्स कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याचे आणि अनुचित पद्धतीने व्यापार केल्याचे आदेश पारित केले आहेत.
'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहातील 'टाटा कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेड' (TCPL) बिस्लेरी खरेदी करणार आहे. हा करार झाल्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाकडून कंपनीने व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. बिस्लेरी कंपनीचे भारतासह इतर देशांमधील मिनरल वॉटरच्या बाजारपेठेवर मोठे वर्चस्व आहे. मागील तीन दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटरच्या बाजारपेठेत वर्चस्व असणारी बिस्लेरी कंपनी ही आता 'टाटा' समूहाच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. टाटा समूह बिस्लेरी कंपनी सहा ते सात हजार कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. लवकरच हा
अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लॅश सेल आयोजित करतात. मोबाईल, लॅपटॉपसारख्या ईलेक्ट्रॉनिक कंपन्यांना या फ्लॅश सेलचा मोठा फायदा होतो. मात्र, ई-कॉमर्स कंपन्यांची ही विक्रीची पद्धत लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आवाहन
उत्पादक अथवा कंपन्या यांच्या दंडेलशाहीमुळे सर्वसामान्य ग्राहक भरडला जात असे. अशा ग्राहकाला या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त झाले. ग्राहकांमध्ये त्यांना असलेल्या हक्कांची जागृती व्हावी व ग्राहक संघटित व्हावेत, याकरिता ग्राहक संरक्षण कायदा लागू होण्याच्या कितीतरी आधीपासून ग्राहक चळवळीचे काम सुरू झालेले असल्याचे दिसते..
नवा ग्राहक संरक्षण कायदा सोमवारपासून लागू होणार असून यामध्ये ग्राहकांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचे जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या पुण्यात सार्वजनिक कार्यक्रम घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीतील संस्था चालकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भुजबळांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी हजारो पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिथे राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गरज नसल्यास न जाण्याचे आवाहन केले जात आहे, अशातच मंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वसामान्या
ग्राहकांसाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, त्याचा कोणताही वापर न करता केवळ व्यवस्थेच्या नावाने शिमगा करणार्या बहाद्दरांसाठी श्रावणीचा लढा हे एक आदर्श उदाहरण आहे. ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत शाळेत शिकविलेले धडे श्रावणीने प्रत्यक्षात आणत ‘ग्राहकदेवो भव:।’ या ब्रीदाची सत्यता प्रत्यक्षात साकारली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने सुरु केलेल्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावर दररोज अनेक तक्रारी येत असतात. यातल्या बहुतांश तक्रारींचे वेळेत निवारण केले जाते अशी माहिती ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत दिली.
१५ मार्च म्हणजे 'जागतिक ग्राहक हक्क दिन'... यानिमित्ताने जाणून घेऊया काय आहेत ग्राहकांचे हक्क? फसवणूक झाल्यास कशी कराल कारवाई? आणि इतर अशा गोष्टी ज्या 'जागरूक ग्राहक' म्हणून जाणून घेऊयात...
ग्राहक चळवळीमधील महिलांचा कामाचा अनुभव, ग्राहकांच्या प्रश्नांसंदर्भात असणारी समज आणि शैक्षणिक गुणवत्ता या सगळ्याचा एकत्रित विचार करून ग्राहक मंचात एका महिला सदस्याची नेमणूक होत होती.
पाचोरा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतची सभा नुकतीच झाली. त्यात जळगाव जिल्हाध्यक्ष विकास महाजन यांची महाराष्ट्र शासनाने राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवर शासन नामनियुक्त सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल पाचोरा अखिल भारतीय ग्राहक पंचायततर्फे या निवडीचे स्वागत करण्यात आले.