होनसा कनज्यूमर लिमिटेडकडून कोसमोजेनेसिस लॅब्सचे अधिग्रहण

४ कोटी रुपयांना कंपनीचे अधिग्रहण झाले

    28-May-2024
Total Views |

Honasa
 
 
मुंबई: मामाअर्थ कंपनीची उपकंपनी होनसा कनज्यूमर लिमिटेड कंपनीने कोसमोजेनेसिस लॅब्स या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. तशी माहिती कंपनीने दिलेली आहे. भारतीय ग्राहकांच्या सेवेत आपला पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनी कडून घेण्यात आला आहे.या कंपनीचे The Derma co, Aqualogica, Dr Sheths ही कंपनीची पर्सनल केअर उत्पादने आहेत.
 
मागच्या तिमाहीत होनसा कनज्यूमर कंपनीला ३० कोटींचा करोत्तर नफा ( Profit After Tax) झाला.कंपनीच्या ईबीआयटीडीए  मध्ये (EBITDA) कर व इतर खर्च पूर्व नफ्यात ७ टक्क्यांनी वाढत ३३ कोटी झाला होता. संपूर्ण वर्षासाठी कंपनीला १११ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कोसमोजेनेसिस कंपनी कॉस्मेटिक डेव्हलपमेंट कंपनी असून कंपनी प्रिमियम स्कीनकेअर सुविधा पुरवते. २०११ साली ही कंपनी स्थापन झाली होती.
 
अधिग्रहणाविषयी बोलताना, CosmoGenesis कंपनीच्या संस्थापक रोहीणी मनोज म्हणाल्या, ' आम्ही होनासा कनज्यूमरसोबत काही काळ काम करत आहोत आणि यापूर्वी काही नवकल्पनांवर आम्ही एकत्र काम केले आहे.'
 
अधिग्रहणाविषयी बोलताना Honasa Consumer Limited कंपनीच्या सह संस्थापक गझल सिंह म्हणाल्या, ' CosmoGenesis सोबतच्या या धोरणात्मक युतीमुळे अधिक कार्यक्षमतेसह नवीन ट्रेंडचे संशोधन करण्याची आमची क्षमता वेगाने वाढेल आणि सर्वोत्तम-इन-क्लास उत्पादने तयार करण्यात मदत होईल. हे संपादन आम्हाला नवीन उप-श्रेणींमध्ये टॅप करण्यासाठी, अत्याधुनिक संशोधन आणि विकासाचा लाभ घेण्यास आणि शेवटी, आमच्या ग्राहकांना अपवादात्मक मूल्य प्रदान करण्यास सक्षम करते.'