मीठ चहानंतर आता Bisleri होणार टाटांची !

    24-Nov-2022
Total Views |

Bisleri
 
 
 
 
मुंबई : 'बिझनेस टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहातील 'टाटा कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेड' (TCPL) बिस्लेरी खरेदी करणार आहे. हा करार झाल्यानंतरही विद्यमान संचालक मंडळाकडून कंपनीने व्यवस्थापन पाहिले जाणार आहे. बिस्लेरी कंपनीचे भारतासह इतर देशांमधील मिनरल वॉटरच्या बाजारपेठेवर मोठे वर्चस्व आहे. मागील तीन दशकांपासून अधिक काळ मिनरल वॉटरच्या बाजारपेठेत वर्चस्व असणारी बिस्लेरी कंपनी ही आता 'टाटा' समूहाच्या मालकीची होण्याची शक्यता आहे. टाटा समूह बिस्लेरी कंपनी सहा ते सात हजार कोटींना खरेदी करण्याची शक्यता आहे. लवकरच हा करार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.
 
 
या कराराबाबत माहिती देताना 'इकॉनॉमिक टाइम्स'ने म्हटले की, उद्योजक रमेश चौहान हे सध्या 82 वर्षांचे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून वयोमानामुळे प्रकृती बरी नसते. त्याशिवाय, बिस्लेरी कंपनीला भविष्यात पुढे नेण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी उत्तराधिकारीदेखील नाही. त्यांची कन्या जयंती या व्यवसायाबाबत फारशा व्यवसायाबाबत उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बिस्लेरी कंपनी विक्री करण्यात येणार आहे.