कंपनीची कुठलीही मालमत्ता दुबईत नाही; जप्ती आदेशानंतर स्पष्टीकरण

    05-Oct-2024
Total Views | 17
we-have-no-property-in-uae


नवी दिल्ली :      सौदर्यप्रसाधने निर्मिती क्षेत्रातील कंपनी 'मामाअर्थ'ची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड नवा खुलासा केला आहे. संयुक्त अरब अमिराती(युएई)मध्ये कंपनीच्या मालकीची कुठलीही मालमत्ता नाही असे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे. दरम्यान, वितरण अधिकार संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावरून आरएसएम जनरल ट्रेडिंग एलएलसीसोबत सुरू असलेल्या खटल्यात दुबई न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत.




होनासा कंझ्युमर लिमिटकडे डर्मा आणि एक्वालोगिका या ब्रँडचीही मालकी आहे. दुबईच्या न्यायालयाने यूएईमधील कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु होनासा कंझ्युमर जनरल ट्रेडिंग एलएलसीचा व्यवसाय परवाना रद्द करण्यास नकार दिला आहे. कंपनीने सांगितले.

कंपनीची मालमत्ता जप्त केली जाणार नसून कंपनीची कोणतीही मालमत्ता युएईमध्ये नाही, असे कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले. दि. ०६ जून २०२४ रोजी दुबई, युएईमधील कोर्ट ऑफ मेरिट्सने दिलेल्या सावधगिरीच्या आदेशाविरुध्द तक्रार निवेदन दाखल करण्यात आली होती. दुबई न्यायालयाने आरएसएम आणि होनासा यांनी दाखल केलेल्या दोन्ही अपील फेटाळल्या आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121