आता सायबर-फसवणुकीवर ‘चक्षु’; केंद्रीय प्रणाली लवकरच कार्यान्वित!

    05-Oct-2024
Total Views |
Bharat, Cyber Crime, DOT


नवी दिल्ली :     सायबर-फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. अलीकडील काळात भारतीय मोबाईल क्रमांकावरून फसवे फोनकॉल्स प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकारांना चाप बसविण्यासाठी केंद्रीय प्रणाली लवकरच रुजू होणार आहे. फसव्या कॉल्सची माहिती देण्यासाठी ‘चक्षु’ मंचाचा वापर करण्याचा नागरिकांना सल्ला देण्यात येत आहे.


हे वाचलंत का? -    पुढील दशकभरात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणार; काय म्हणाल्या अर्थमंत्री जाणून घ्या


दरम्यान, नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये नागरिकांना गुंगी आणणारी औषधे, अंमली पदार्थ यांच्या गैरव्यवहारात आणि सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे खोटे आरोप करणारे कॉल्स आल्यामुळे यासंदर्भातील चिंतेत आणखी भर पडली आहे. यासंदर्भातील वाढत्या घटनांना प्रतिसाद देत केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या (टीएसपीज) सहयोगासह एक प्रगत प्रणाली निर्माण केली आहे.

फसवे फोन कॉल्स रोखण्यासाठी सरकारकडून दोन टप्प्यांमध्ये यंत्रणा लागू करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात टीएसपी पातळी यात मूळ ग्राहकाच्या क्रमांकावरून केले जाणारे फसवे रोखले जातील. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय स्तरातून इतर टीएसपीजच्या ग्राहकांच्या क्रमांकांवरून होणारे फसवे कॉल्स रोखण्यात येतील. देशातील सर्व म्हणजे चारही टीएसपीजनी सदर यंत्रणा यशस्वीरित्या राबवली आहे.