चॉकलेटमधील लिड, कॅडमियमच्या प्रमाणाबाबत चिंता - ग्राहक अहवाल

    27-Oct-2023
Total Views |

Harsheys
 
चॉकलेटमधील लिड, कॅडमियमच्या प्रमाणाबाबत चिंता - ग्राहक अहवाल
 

नवी दिल्ली: अनेक चॉकलेट्समधील लिड, कॅडमियम मधील प्रमाणाबाबत एका ग्राहक अहवालाने चिंता व्यक्त केली आहे. चॉकलेट कंपनी ' Hershey' ला चॉकलेट मधील जड धातूंचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला या अहवालात दिला गेला आहे. विना नफा (Non Profit) ग्राहक संघाच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे ४८ पैकी १६ चॉकलेट उत्पादनात मोठ्या प्रमाणात लीड, कॅडमियम आढळून आल्याने हे प्रमाण कमी करण्याची शिफारस यात केली आहे. डार्क चॉकलेट बार, मिल्क बार, कोकोआ पावडर, चॉकलेट चिप्स, ब्राऊनीज, चॉकलेट केक, हॉट चॉकलेट या सात वर्गातील चॉकलेटचे सर्वेक्षण करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने ही शिफारस करण्यात आली आहे.
 
 
मिल्क चॉकलेट बार, काही कोकोआचे घन हे मात्र ग्राहकांसाठी जास्त सुरक्षित पर्याय असून Harshey's, Nestle, Starbucks यांच्या काही चॉकलेट उत्पादनाला लीड व कॅडमियम कमी करण्याचे आवाहन केले गेले आहे. या मेटल पदार्थांच्या अधिक सेवनाने किडनी, रोगप्रतिकारक शक्ती, नर्व्हस सिस्टिम यावर प्रादुर्भाव होतो.