ग्राहक संरक्षण कायद्यातील महत्त्वपूर्ण सुधारणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

consumer protection _1&nb

उत्पादक अथवा कंपन्या यांच्या दंडेलशाहीमुळे सर्वसामान्य ग्राहक भरडला जात असे. अशा ग्राहकाला या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त झाले. ग्राहकांमध्ये त्यांना असलेल्या हक्कांची जागृती व्हावी व ग्राहक संघटित व्हावेत, याकरिता ग्राहक संरक्षण कायदा लागू होण्याच्या कितीतरी आधीपासून ग्राहक चळवळीचे काम सुरू झालेले असल्याचे दिसते.



ग्राहक संरक्षण कायद्याला संसदेने दि. २४ डिसेंबर, १९८६रोजी संमती दिली. या कायद्याच्या नावावरूनच ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केलेला हा कायदा असल्याचे लक्षात येते. ग्राहक संरक्षण कायद्यात दि. २० जुलै, २०२० पासून महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत, याबाबतची अधिसूचना लवकरच निघेल.सर्वसामान्य माणूस, केंद्रबिंदू धरून केलेला हा कायदा क्रांतिकारी स्वरूपाचा असल्याचे म्हटले पाहिजे. भाडे नियंत्रण कायदा लागू होण्यापूर्वी ज्याप्रमाणे घरमालकांच्या मनमानीला भाडेकरूंना तोंड द्यावे लागत असे व घरमालकांच्या मर्जीवर भाडेकरूंचे राहणे अवलंबून असते, त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायदा लागू होण्यापूर्वी सर्वसामान्य ग्राहकाला कोणतेच संरक्षण उपलब्ध नव्हते. उत्पादक अथवा कंपन्या यांच्या दंडेलशाहीमुळे सर्वसामान्य ग्राहक भरडला जात असे. अशा ग्राहकाला या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त झाले. ग्राहकांमध्ये त्यांना असलेल्या हक्कांची जागृती व्हावी व ग्राहक संघटित व्हावेत, याकरिता ग्राहक संरक्षण कायदा लागू होण्याच्या कितीतरी आधीपासून ग्राहक चळवळीचे काम सुरू झालेले असल्याचे दिसते.


महाराष्ट्रात ग्राहक चळवळीचे योगदान फार मोठे आहे. मुंबई ग्राहक पंचायत, पुण्याची ग्राहकपेठ ही त्याची ठळक उदाहरणे देता येतील. हा कायदा लागू झाल्यापासून त्याची व्याप्ती आता खूपच वाढली आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रांचा समावेश ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आता झाला आहे. गृहनिर्माण संस्थेसह कोणत्याही सहकारी संस्थेचा सभासद या संस्थेविरुद्ध या कायद्यान्वये आता दाद मागू शकतो. गुंतवणूकदार व ठेवीदार हे ग्राहकच समजले जातात व त्यांना कंपन्यांविरुद्ध या कायद्यान्वये दाद मागता येते. विमा कंपन्या, टेलिफोन कंपन्या वीज मंडळे, गृहनिर्माण मंडळे इ. सर्वांविरुद्ध ग्राहक तक्रार मंचाकडे दाद मागता येते. ‘भविष्य निर्वाह निधी’चा सभासद असलेल्या कर्मचार्‍यास विमानतळाबाहेर टॅक्सी पोहोचल्यानंतर टॅक्सीची डिकी न उघडल्याने त्यात ठेवलेले सामान बाहेर काढता आले नाही, त्यामुळे प्रवाशाचे नियोजित विमान चुकले आणि दुसर्‍या विमानासाठी नव्याने तिकीट काढावे लागले. ग्राहक मंचाने ही गोष्ट म्हणजे सेवेमधली त्रुटी असा निष्कर्ष काढून टॅक्सी कंपनीला नुकसानभरपाईचा आदेश दिला. एका शेतकर्‍याने ज्या कंपनीकडून, जमिनीत लावण्यासाठी पैसे देऊन बियाणे खरेदी केले ते बियाणे दोषयुक्त निघाले. बियाणे दोषयुक्त निघाले. बियाणे पुरविणार्‍या कंपनी विरुद्ध शेतकर्‍याला ग्राहक मंचाकडे दाद मागता आली. एका ग्राहकाने त्याच्या बाथरुमध्ये बसविण्यासाठी टाईल्स पुरविणार्‍या व्यापार्‍याकडून टाईल्स खरेदी करून त्या गवंडी काम करणार्‍याकडून बाथरुममध्ये बसवून घेतल्यानंतर सर्व टाईल्स एका आठवड्यातच फुगून आल्या. ग्राहकाने टाईल्स उत्पादन करणारी कंपनी आणि विक्रेता यांच्या विरुद्ध दाखल केलेली तक्रार ग्राहक मंचाने मान्य केली आणि कंपनी व विक्रेता यांना नुकसानभरपाईचा आदेश दिला.

एका प्रकाशन संस्थेने वाचकांसाठी ठेव योजना जाहीर केली. पाच वर्षांसाठी ठरावीक रक्कम ठेव म्हणून प्रकाशन संस्थेकडे ठेवायची. या कालावधीत ठेवीवरल्या व्याजाएवढी रकमेची पुस्तके वाचकांना मिळतील आणि पाच वर्षांची मुदत संपल्यावर मूळ ठेवीची रक्कम परत दिली जाईल, असे योजनेचे स्वरूप होते. ठेवीची मुदत संपल्यांनतर रक्कम न मिळाल्याने ग्राहक न्यायालयाकडे काही वाचकांनी तक्रार दाखल केली असता ठेवींची रक्कम परत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने प्रकाशन संस्थेला दिला. केंद्र शासनाने ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये २० जुलै, २०२पासून केलेल्या दुरुस्त्या ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ‘जिल्हा ग्राहक मंचां’ना आता ‘जिल्हा ग्राहक आयोग’ असे संबोधण्यात येईल. जिल्हा ग्राहक आयोगाकडे दुरुस्त कायद्याच्या आधी रु. २०लाख मूल्यांकनापर्यंतची प्रकरणे वाढविण्यात आली आहेत. तसेच उशीर माफीची तरतूद ठेवण्यात आली आहे. दिलेल्या निर्णयावर आवश्यक वाटल्यास फेरविचार करण्याचा अधिकार जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय आयोग यांना देण्यात आला आहे. एखादे प्रकरण मध्यस्थीने सोडविले जाऊ शकत असल्यास त्यालाही मान्यता देण्यात आली आहे.ग्राहक हा राजा आहे, या उद्देशाने हा कायदा अधिकाधिक ग्राहकाभिमुख बनविण्याचा प्रयत्न या कायद्यातील नव्याने करण्यात आलेल्या सुधारणेमुळे होणार आहे.


- अ‍ॅड. सुरेश पटवर्धन
@@AUTHORINFO_V1@@