कोरोना विषाणू : सरकारी आदेश मोडत भूजबळांतर्फे शाळेचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Mar-2020
Total Views |
Chhagan-Bhujbal _1 &





पुण्यातील शाळेचे उद्घाटन


पुणे : राज्यात कोरोना व्हायरसचे जिथे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत, त्या पुण्यात सार्वजनिक कार्यक्रम घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. पुण्यातील ससाणे एज्युकेशन सोसायटीतील संस्था चालकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भुजबळांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी हजारो पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिथे राज्य सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गरज नसल्यास न जाण्याचे आवाहन केले जात आहे, अशातच मंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे. 

महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये, जलतरण तलाव, मॉल्स, सिनेमागृह बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. पुणे हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलतर्फे शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळांना सुटी जाहीर केली असतानाही या ठिकाणी मोठया संख्येने पालक व विद्यार्थी जमले होते. विशेष म्हणजे राज्याचे मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. या प्रकरणी शाळा, संस्थाचालकांवर कारवाई होणार का? तसेच मंत्रीमहोदयांच्या उपस्थितीबद्दल सरकार काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

आजचा कार्यक्रम हा यापूर्वी दोनदा रद्द करण्यात आला होता. रविवार दि. १५ मार्च रोजी ठरल्याप्रमाणे मी या कार्यक्रमाला गेलो होतो. मी कुठेही भाषण केलेले नाही. ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर आम्ही रवाना झालो, असा खुलासा भुजबळ यांनी केला आहे.



@@AUTHORINFO_V1@@