For the work of parallel road in Jalgaon The mayor took the lead
Read More
ज्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येणे भाग पडते पण येथे काळजी, देखभाल करण्यासाठी कुणीच नाही, आणि जेवणाचीही व्यवस्था नाही..., अशा गरजूंसाठी अथांग मानवताधर्म भावनेने कार्यरत आहे दिलासादायी ‘सेवालय’ प्रकल्प.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रशस्त जागेत गेल्या ५ वर्षांपासून हे सेवाकार्य सुरू आहे. त्यात सध्या रोज सकाळी ९ च्या सुमारास ६० जणांना नाश्ता (उसळ, उपमा, पोहे आदी) आणि सकाळी ११ वाजता सुमारे १०० जणांना ताजा, पौष्टिक व सात्विक आहार सन्मानपूर्वक व प्र
गिरणा नदीवर निमखेडीजवळ बंधारा बांधल्यास त्यात जमा होणार्या पाण्यामुळे तापमान वाढ नियंत्रणात येईल तसेच पाण्याचा अतिरिक्त साठाही उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती अभियंता प्रकाश पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
गाळे प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी येत्या चार ते पाच दिवसात समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती आ. सुरेश भोळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझं काय चुकलं, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाहीररीत्या व्यक्त केली.
जळगाव शहराचा विकास होण्यासाठी महापालिकेत भाजपाची सत्ता यावी असा निर्धार जळगावकरांनी केला आहे. त्यामुळे पायाखालची वाळू सरकलेल्या शिवसेना नेत्यांची काळजी अधिक वाढली आहे. यातून मतदारांची दिशाभूल करण्याचे घाणेरडे प्रकार त्यांनी सुरू केले आहेत. पण जळगावचा सुज्ञ मतदार त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही आणि महापालिकेची एकहाती सत्ता भाजपालाच देईल, असा ठाम विश्वास आ. सुरेश भोळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केला.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब जळगाव वेस्टतर्फे गुरूवारी रोटरी हॉलमध्ये आयोजित सर्वपक्षीय परिसंवादात उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना माजी महापौर नितीन लड्डा यांची चांगलीच दमछाक झाली.
पक्षाला माझी गरज राहिलेली नाही आणि वाटतही नसावी, त्यामुळे मला जळगाव महानगरपालिका निवडणुकीत प्रचारासाठी कुणी बोलावलेे नाही.
जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १, २ व १६ मधील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ २२ रोजी सकाळी ८ वाजता आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते वाढविण्यात येणार आहे. पंचमुखी हनुमान मंदिर येथे हा कार्यक्रम होईल.
शहराच्या विकासासाठी २५ कोटी कुणी आणले, कुणी खर्च करू दिले नाही हे सर्वश्रेष्ठ जनता जनार्दन जाणते. मतपेटीतून ते आपला कौल देतीलच. भाजपावर खोटे आरोप करणार्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे.
भाजपाला एकदा संधी द्या, जळगाव शहराचा एक वर्षात चेहरामोहरा बदलून दाखवतो. बोलण्यापेक्षा काम करून दाखविण्यावर आमचा विश्वास आहे.
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकिचा बिगुल वाजला असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 75 उमेदवारांचे भवितव्य 1 ऑगस्टरोजी मतपेटीत बंद होईल व 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आणण्यासाठी सर्वांनी संघटनात्मक बांधणी भक्कम करावी, असे आवाहन पक्षाचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी केले.
तरुणांमध्ये स्टार्ट अप बद्दल प्रचंड क्रेज दिसून येते. स्टार्टअप मध्ये येणारे पहिले अपयश हा नवीन शोधाचा उगम असतो. त्यातूनच भविष्यातील मोठ्या यशस्वी स्टार्टअप ची सुरुवात होते. यासाठी तरुणांनी केवळ ऐकीव माहितीच्या आधारे किंवा केवळ इतरांचे अनुकरण न करता योग्य मार्गदर्शक व सहकारी किंवा तज्ञांची जुळवाजुळव करून आपल्या स्टार्टअप ची सुरुवात करावी असा सल्ला तज्ञांनी आज जळगाव जिल्ह्यातील तरुणांना दिला.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटात पडद्याआड अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून, शहरात विकासकामे होत नसल्याच्या नाराजीतून मातब्बर नेते आणि काही नगरसेवक आ. सुरेश भोळे यांच्या संपर्कात आहेत.
शहर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकास योगनेअंतर्गत सन २०१७-१७ च्या लेखाशीर्षनुसार जळगाव शहरासाठी ५ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
शहराची लोकसंख्या ५ लाख असून, ६० टक्के जनतेला कोणत्याही मुलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. याला मुख्य कारण महापालिकेवरील हुडकोचे कर्ज आहे.