नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचा सोलापूर प्रकल्प आता वीज निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील.
Read More
अविनाश हजारिका... ज्यांनी स्वतः स्वावलंबी होण्याबरोबरच गावकर्यांनाही स्वावलंबनातून समृद्धीचा मार्ग दाखवत त्यांच्या आयुष्याचा कायापालट केला, अशा माणसाची ही यशोगाथा...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त शासकीय आयटीआयमध्ये 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांबू शिल्प प्रशिक्षण कार्यक्रम' राबविणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. तसेच, अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि परिवर्तनात आपल्या साहित्यातून अमूल्य योगदान दिले असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असेही लोढा यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील वनवासी भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व रोजगारनिर्मितीसाठी कार्य करणार्या ‘सेवा विवेक’च्या वनवासी भगिनींनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या आकर्षक राख्यांचे विमोचन राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच पुणे येथील राजभवनात करण्यात आले.
‘सेंटर फॉर इंडियन बांबू रिसोर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘सिबार्ट’चे संचालक म्हणून संजीव कर्पे कार्यरत आहेत. तसेच युरोपियन युनियनच्या अर्थसाहाय्याने सुरु असलेल्या एका प्रकल्पावर ते बांबूतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाचे ‘मॉड्यूलर बांबू फर्निचर क्लस्टर, सिंधुदुर्ग’ याचे अध्यक्ष म्हणूनसुद्धा संजीव कर्पे कार्यरत आहेत.
अंतिम प्रवासाच्या निजधामाकडे जाताना आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाचा बांबूशी संबंध येत असतो. परंतु, सुनील देशपांडे यांचे तर संपूर्ण जीवनच बांबूमय होते. ‘बांबू’ ही नुसती कार्यजीवनाची सुरुवात नव्हती, तर त्यांच्या जीवनाची खरी ओळख बनली होती, इतका ध्यास त्यांनी या विषयाचा घेतला होता.
आज ‘विवेक’ संस्थेचे जे काही बांबूमधील काम पाहून सर्वांना आनंद होतो, ते आम्ही पूर्ण श्रद्धेने सुनीलजींना अर्पण करतो. हे बांबूचे सेवाकार्य आम्हाला नेहमी सुनीलजी आमच्यातच आहेत, ही आठवण करून देत राहील.
मेळघाटच्या लवादा या लहानशा गावात संपूर्ण बांबू केंद्राची मुहूर्तमेढ रोवणा-या डॉ. सुनील देशपांडे यांचे बुधवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. नागपूर येथील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सह्याद्रीमधून बांबूच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. बांबूंच्या 'मेस' आणि 'मणगा' या दोन प्रजातींना आजतागायत वनस्पतीशास्त्रानुसार 'स्टुडोक्सिटेननथेरा स्टाॅक्सि' या नावानेच ओळखले जात होते. मात्र, संशोधनाअंती या दोन्ही प्रजात वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या वेगवेगळ्या असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे 'मेस' या बांबू प्रजातीचे नामकरण आता 'स्टुडोक्सिटेननथेरा माधवी' असे करण्यात आले आहे.
विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित विवेक राष्ट्र सेवा समितीतर्फे स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती
‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील नऊ गावांतील ३०० महिलांना जानेवारी २०२० मध्ये ‘प्रोजेक्ट ग्रीन गोल्ड’च्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले व त्यामधून स्वायत्तपणे चालणारे १० उद्योगसमूह बनविण्यात आले. त्यांना ५० हजार राख्या बनविण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनीही हे आव्हान म्हणून स्वीकारले व ५० हजार राख्या बनविल्या. या राख्या म्हणजे चीनमधून आयात होणार्या राख्यांना एकप्रकारे सडेतोड उत्तर आहे. वनवासी महिलांनी ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी उचलेले पहिले पाऊल आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती
मागील अर्धा तासापासून विमानांची उड्डाणे खोळंबली
वरील उदाहरणांमधून अर्थतज्ज्ञ हर्मन डॅले यांनी सांगितलेले पहिले तत्त्व सिद्ध होते - 'पुनर्नवीकरणीय संसाधनांच्या वापराचा वेग त्याच्या पैदाशीच्या वेगापेक्षा जास्त नसावा.' उत्तर कन्नडच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून जी बांबूची तोड होत होती, ते निसर्गाचे 'दोहन' होते; तर कागद कारखान्यांकडून जी बांबूची तोड झाली ते निसर्गाचे शोषण होते.
दरवर्षी हजारो टन बटाटे साठवणुकीच्या सुविधांअभावी सडतात, हे पाहून झारखंडमधील महिला शेतकऱ्यांनी कमी खर्चिक आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल, असा बांबूपासून देशी शीतगृहे तयार करण्याचा मार्ग शोधला.
बांबू आधारित रोजगाराला प्रोत्साहन देण्यात यावे, त्यादृष्टीने राज्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी येथे बांबूपासून वस्तुनिर्मितीची प्रशिक्षण केंद्र सुरु करावीत
चंद्रपूरच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने (बीआरटीसी) गेल्या दोन वर्षात अतिशय गतीने कामे सुरु केली आहे.