'आत्मनिर्भर' होऊन साजरी करू यंदाची दिवाळी!

    02-Oct-2020
Total Views | 32

akashkandil_1  


मुंबई :
विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित विवेक राष्ट्र सेवा समितीमार्फत पर्यावरणपूरक स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली आहे. हे आकाशकंदील खरेदी करून यंदाची दिवाळी स्वदेशी वस्तूंच्या वापराने साजरी करावी असे आवाहन ही संस्थेमार्फत करण्यात आले.

वनवासी महिलांना रोजगार प्राप्ती व्हावी म्हणून विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर संचालित विवेक राष्ट्र सेवा समिती पालघर जिल्ह्यात कार्य करत आहे .विवेक सेंटरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणाकरिता पालघर जिल्ह्यातील वनवासी आणि गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा व त्यांना सन्मानजनक रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने ‘विवेक’ या संस्थेने पुढाकार घेतला असून अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षित महिला २१ प्रकारची आकर्षक उत्पादने तयार करत स्वदेशीच्या वापरासाठी प्रोत्साहन देत आहेत. याचाच एक भाग या संस्थमार्फत स्वदेशी आकाशकंदीलची निर्मिती करण्यात आली आहे. हे आकाशकंदील पूर्णतः स्वदेशी व पर्यावरण पूरक बांबूनिर्मित आहेत. यात पाच प्रकारचे आकाशकंदील बनविण्यात आले आहे. यात गुरु आकाशकंदील, शुक्र आकाशकंदील, सप्तर्षी आकाशकंदील, ध्रुव आकाशकंदील याचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या रंगांमध्ये हे उपलब्ध आहेत. या बांबूनिर्मित आकाशकंदिलाच्या खरेदीसाठी संपर्क: ७७९८७११३३३ या नंबरवर सकाळी ११ ते संध्याकाळी ७ यावेळेत संपर्क साधावा. तसेच या आकाशकंदीलबाबत आपले नातेवाईक, परिचित व मित्रमंडळ यांना माहिती करून देते स्वदेशी पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापरासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही संस्थेमार्फत करण्यात आले.


'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमाचा एक भाग म्हणून चिनी वस्तुंना देत या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली जाते. यात ट्रे, आकाशकंदील, मोबाईल होल्डर, राख्या, फ्रूट बास्केट, पेपरवेट, टी कोस्टर इत्यादींसारख्या आकर्षक वस्तूंची निर्मिती होत आहे. सदर उत्पादने ही उच्च प्रतीची व दर्जेदार असल्याने त्यांना मागणीही भरपूर आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121