असल्फा मेट्रोस्थानकाजवळ भीषण आग

    27-Dec-2019
Total Views |


aslfa_1  H x W:


साकीनाका : असल्फा मेट्रो स्थानकाजवळील बांबू गल्लीतील थिनर कारखान्याला भीषण आग लागली आहे. मुंबई अग्निशामक दलाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहे. या भीषण आगीमुळे सर्वत्र आगीचे लोळ उठले असून त्याचा परिणाम विमान उड्डाणांनावर झाला आहे. या आगीचा धूर विमानतळपर्यंत जात आहे. त्यामुळे विमानांची उड्डाणे खोळंबली आहेत. विमानांचे उड्डाण २० ते २५ मिनिटांनी सुरू होणार असल्याची माहिती आहे. थिनर पिंपाचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. आत्तापर्यंत आगीत २५ गाळे आगीत भस्मसात झाले आहेत. आग लागली त्यावेळेस २० ते २५ कर्मचारी काम करत होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनपर्यंत जीवित हानीची कोणतीही माहिती नाही.


सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत अद्याप जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. बांबू गल्लीत काही रासायनिक कारखाने असल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिकांना घराबाहेर काढण्यात आले आहे.