आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या युतीची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बुधवार, १६ जुलै रोजी एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.
Read More
सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार, विश्वास आणि विकास या त्रिसुत्रीवर बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली. नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व प्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल सोमवार, १४ जुलै रोजी विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला सत्ताधाऱ्यांनी अभिवादन केले.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्य
अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत शासनाने २००९ साली काढलेल्या जीआरची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवार, १४ जुलै रोजी विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर सकारात्मक उत्तर दिले.
एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय ऑगस्टमध्ये सुनावणी करणार आहे.
राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांसमोरील कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल, घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
चाकण नगरपरिषदे अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.
मुंबईतील अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्वितीय चमत्कार असून, यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे.
स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
पुणे जिल्ह्यातील उबाठा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार, १० जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
संजय गायकवाड यांच्या कृतीशी आम्ही कुणीही सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांना त्यांनी घरचा आहेर दिला.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये केलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बुधवार, ९ जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रितसर तक्रार करता आली असती, मारहाणीचे समर्थन करणार नाही आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण मारहाणीचे समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोठ्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, ते टिकवायचे असेल तर जात-पात बाजूला सारून कार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये योग्य बदल करण्याची मुभा घटना समितीने दिली आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी मुंबईत केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
'उमरखाडी पुनर्वसन समितीने एकूण ८१ इमारतींच्या समुह पुनर्विकासाचा प्रस्ताव दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी म्हाडा प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रकल्प व्यवहार्यतेची फेरतपासणी करण्याकरीता वास्तुशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तुशास्त्रज्ञाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुनर्विकासाबाबतची पुढील कार्यवाही म्हाडामार्फत करण्यात येईल' अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती सादर केल
(Vitthal Rukmini Mandir Wadala) वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सपत्नीक विठुरायाची पूजा केली, त्यावेळी ते बोलत होते.
ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगरच्या प्रसिद्ध बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरुन गेले. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .आषाढी एकादशीनिमित्त, कल्याण चैरिटी ट्रस्ट, सेंच्युरी रेऑन, बी.के. बिर्ला महाविद्यालय, बी.के. बिर्ला नाईट कॉलेज, बी.के. बिर्ला पब्लिक स्कूल आणि सेंच्युरी रेऑन हायस्कूल यांनी भव्य ज्ञान दिंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानदिंडी सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेतले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असा नारा दिल्याने उबाठा गटासह विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापना केली त्यातून स्वराज्याचे संस्कार पेरले. ही ज्योत छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी, तानाजी यांनी तेवत ठेवली. हीच परंपरा पुढे चालवत थोरले बाजीराव पेशवे यांनी स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. युद्ध कौशल्याच्या माध्यमातून स्वराज्याची सीमा विस्तारण्याचे मोठे कार्य पेशवे यांनी केले आहे. मातृभूमी, धर्मभूमी आणि स्वराज्यासाठी सातत्याने युद्ध करणारे ते एकमेव अजेय आणि पराक्रमी योद्धा आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
पंढपूरची आषाढी वारीमध्ये शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला असल्याचा गंभीर आरोप आमदार मनीषा कायंदे यांनी केला आहे. बुधवार, २ जुलै रोजी विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून त्या बोलत होत्या.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांना अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली.
नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सोमवार, ३० जून रोजी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेतील ३ माजी महापौरांसह २५ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, २२ जून रोजी द्रास येथे 'सरहद्द शौर्यथॉन-२०२५' या स्पर्धेला झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन केले. कारगिल युद्धाला २६ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय सैन्यदल, सरहद्द संस्था, पुणे तसेच आरहम फाऊंडेशनच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
तीन वर्षांपूर्वी २१ तारखेला आम्ही एक मोठा मॅरेथॉन योगा केला होता, असे मिश्कील विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुवार, २१ जून रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे मेळावे घेण्यात येणार आहे. गुरुवार, १९ जून रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या मेळाव्यात दोन्ही पक्ष महापालिका निवडणूकांचे रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक व्यंगचित्र चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून हिंदूत्वाच्या मुद्दयावरून उबाठा गटाला डिवचल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही पक्षांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. उबाठा गटाच्या मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव या चार जिल्ह्यातील कांग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने महाविकास आघाडीला खिंडार पडले आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
नाशिकमधील उबाठा गटाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले
मागील काही दशकांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय आखाड्यात जेवढा संवेदनशील झाला आहे तेवढाच तो न्यायालयीन दृष्टीने किचकट बनला आहे. २०१९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांआधारे आरक्षण दिले होते, परंतु ते मे २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले. याबाबत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, जी एप्रिल २०२३ मध्ये फेटाळण्यात आली. त्यानंतर, एक उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल करण्यात आली, जी सध्
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवार, ९ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच चंद्रहार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
माजी मंत्री तथा काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवार, ६ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
महापालिका निवडणुकांसाठी पुणे महानगरात आता सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची लगबग सुरू झालेली दिसते.
समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. गुरुवार, ५ जून रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते.
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ' दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता '' धोरण अवलंबिले
ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त तसेच मयत झालेल्या सफाई कामगारांच्या वारसाहक्काने महापालिकेच्या सेवेत येणाऱ्या 15 जणांचे नियुक्ती आदेश आज प्रशासनाने निर्गमित केल्याने सर्व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क लागू व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून प्रलंबित वारसा हक्क
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने कंबर कसली असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. बुधवार, २१ मे रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला.
"सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन 'प्रकरणे' दाखल करावी लागणार आहेत. त्यासाठी सहकार कायद्यात आवश्यक बदल करावे लागतील. सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १२ मे रोजी केली