पुण्यात ठाकरे बंधूंना धक्का! मनसे आणि उबाठातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

    11-Jul-2025   
Total Views |


मुंबई : पुणे जिल्ह्यातील उबाठा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार, १० जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


याप्रसंगी खासदार नरेश म्हस्के, पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना सचिव संजय मोरे, राम रेपाळे, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी वैभव वाघ, स्वप्नील नाईक, उमेशगलींदे, अभिमन्यू मैद, सुधीर ढमाले, निलेश जाधव, संदेश पावसकर, अथर्व पिसाळ, विजय गालफाडे, अनिल बाटणे, महेश चव्हाण, महेश सूर्यवंशी, उबाठा प्रभागप्रमुख देवेंद्र शेळके, गोरखबांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओंकार मालुसरे, कॅन्सरबाबत समुपदेशन करणारे सामाजिक कार्यकर्ते युनूस सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे.



अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....