"तीन वर्षांपूर्वी २१ तारखेला आम्ही एक मोठा मॅरेथॉन योगा..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मिश्कील विधान
21-Jun-2025
Total Views |
मुंबई : तीन वर्षांपूर्वी २१ तारखेला आम्ही एक मोठा मॅरेथॉन योगा केला होता, असे मिश्कील विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुवार, २१ जून रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "प्रत्येक क्षेत्रात माणसाला तणाव असतो. तो कमी करण्यासाठी योग हा एकमात्र उपाय आहे. योग ही एक दिवस करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे प्रत्येकाने दररोज योग केला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, "तीन वर्षांपूर्वी २१ तारखेला आपण परिवर्तन घडवले. त्यामुळेच आज हे सगळे पाहतो आहोत. आपण विकासाला चालना दिली. २१ तारखेला आम्ही एक मोठा योग केला, तो एक मॅरेथॉन योग होता. त्यामुळे महाराष्ट्रात मोठे परिवर्तन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मदतीने या राज्याचा विकास होत आहे. विकासाच्या दृष्टीकोनातून २१ तारखेचा तो दिवस हा महाराष्ट्रासाठी भाग्यवान होता. मागच्या तीन वर्षात खूप मोठा विकास झाला असून केवळ विकास हाच आमचा अजेंडा आहे," असेही ते यावेळी म्हणाले.