स्वच्छता ही केवळ एखाद्या विशिष्ट अभियानापुरती मर्यादित न ठेवता नियमित आणि जबाबदारीने स्वच्छता राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्य करावे. तथापि, घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रत्यक्ष दैनंदिन स्वच्छता करण्यासाठी नेमलेले मात्र कायमस्वरूपी गैरहजर असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत.
Read More
महाराष्ट्र राज्याला घनकचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून केवळ पर्यावरण रक्षणच नव्हे, तर नवीन आर्थिक संधी, रोजगार, नावीन्य आणि निर्यातक्षम उत्पादने यांचा लाभ मिळू शकतो. हे शक्य आहे, जर आपण सर्वांनी मिळून ‘कचर्याची किंमत’ ओळखली आणि त्याचे रूपांतर मूल्यात केले तरच. हा प्रश्न सरकारचा, उद्योगांचा किंवा पालिकेचा नाही, हा प्रश्न आपला आहे. या प्रश्नाची उकल करणारा हा लेख...
कचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महाराष्ट्र सरकारला ठोठावलेल्या १२ हजार कोटींच्या दंडात्मक आदेशाला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सप्टेंबर २०२२ मधील या आदेशाला राज्य सरकारने न्यायालयात आव्हान दिले होते.
कल्याण डोंबिवलीतील घन कचरा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतन वेळेत मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कडोंमपा प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही वेळेत वेतन मिळत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद केले आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील सुमारे १ हजाराच्या आसपास कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. या कंत्राटी कामगारांनी बुधवारी सामूहिक सुट्टी टाकली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कल्याण डोंबिवलीत कचरा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर देण्यात येणार आहे. परिणामी खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
नाशिक : सातपूर व पंचवटी विभागात घनकचरा संकलित करणार्या घंटागाडी ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तीचा भंग केला होता. गेल्या चार महिन्यांपासून रोखून धरलेली जवळपास अकरा कोटी रुपयांची देयके अदा करण्याची घाई घनकचरा विभागाच्या अधिकार्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ठरली आहे.
राज्य सरकारतर्फे केंद्राच्या महत्वकांशी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हर घर जल: जनजीवन मिशनद्वारे पाण्याबरोबर स्वच्छताही हे अभियान राबविले जाणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी करण्यासाठी हा सुमारे २०,००० कोटी रुपये हा निधी वर्ग केला जाणार आहे. तसेच १६५६ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प असणार आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती आणि स्वछतेसाठी आयोजित केलेल्या पुणे मेयर प्लॉग-ए- थोन उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात चालत चालत कचरा उचलणे तसेच नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वछ्तेबाबत जागरूकता निर्माण करणे हे प्रकार होते.
मनसेचे लाडके आमदार कर्जतला येणार असल्याचे कळताच क.डों.म.पा.चे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी पाटील यांना कर्जत नगरपरिषदच्या शून्य कचरा प्रकल्पाला भेट द्यावी अशी विनंती करताच ती तात्काळ मान्य करत आज दिनांक २६ जून २०२१ रोजी आमदार राजु पाटील यांनी सदर प्रकल्पाला भेट दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभर असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले आहे. हॉटेल, मॉल, दुकाने बंद असल्याने कचऱ्याचे प्रमाणात घट झाली आहे. रोजच्या साडेसात हजार मेट्रिक टनावरून साडेचार हजार मेट्रिक टनावर आले असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने भारतातील पाणथळींची एकूणच स्थिती, मुंबई उच्च न्यायालयात पाणथळींच्या संरक्षणार्थ दाखल जनहित याचिका यांचा ऊहापोह करणारा लेख...
कचरामुक्तीचा ठाणे पॅटर्न
दोन दिवसांच्या मान्सूनपूर्व सरींनीच मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात काय परिस्थिती उद्भवेल, याचे ट्रेलर दाखवले. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या, नालेसफाई, धोकादायक स्थळे यांचा या लेखात घेतलेला आढावा...
जळगाव महापालिकेने बीओटी तत्त्वावर हंजीर बायोटेक या कंपनीला चालविण्यास दिलेला घनकचरा प्रकल्प गेल्या साडेचार वर्षांपासून बंद आहे. हा प्रकल्प बंद असला तरी या ठिकाणी दररोज महापालिकेतर्फे शहरातील सुमारे १२० टन कचरा टाकला जात आहे.