'इच्छाशक्ती' आपले शहर 'स्वच्छ व सुंदर' ठेवायची !

    26-Jun-2021
Total Views |

raju patil_1  H



मुंबई
: मनसेचे लाडके आमदार कर्जतला येणार असल्याचे कळताच क.डों.म.पा.चे घनकचरा व्यवस्थापनाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी पाटील यांना कर्जत नगरपरिषदच्या शून्य कचरा प्रकल्पाला भेट द्यावी अशी विनंती करताच ती तात्काळ मान्य करत आज दिनांक २६ जून २०२१ रोजी आमदार राजु पाटील यांनी सदर प्रकल्पाला भेट दिली.


कर्जत येथील शून्य कचरा मोहीम यशस्वी करुन कोकरे साहेबांनी तयार केलेल्या सदर प्रकल्पाची संपुर्ण माहिती यावेळी आमदार राजु पाटील यांनी घेतली.घनकचरा वर्गीकरण,ओला कचरा,सुका कचरा, प्लॅस्टीक,थर्माकोल,प्रकल्पामध्येच फुलवलेली सुंदर फुलबाग,खत निर्मिती,त्यापासुन केलेले पेव्हर ब्लॅाक्स,स्पीड ब्रेकर्स,त्यातून नगरपरीषदेला मिळणारे उत्पन्न तसेच स्थानिक नागरीकांकडुन सदर प्रकल्पाचे केले गेलेले कौतुक हे सगळे लक्षपूर्वक ऐकुन आमदार राजु पाटील यांनी सुद्धा उपायुक्त कोकरे यांना कौतुकाची थाप दिली.

क.डों.म.पा. माननीय आयुक्त व उपायुक्त कोकरे यांनी शून्य कचरा मोहीम सुरु केलेली आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही कचरा आढळून येतो याबाबत कशी सुधारणा करता येईल यांवर पण चर्चा केली तसेच संपुर्ण कल्याणडोंबिवली करीता कचरा संकलन व वर्गीकरण करण्यासाठी प्रभागनिहाय विकेंद्रीकरण करण्यासाठी सूचना करुन त्यासाठी लागेल ती मदत करण्याची तयारी या वेळी आमदारांनी दिली व शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठीच्या पालिकेच्या कार्यास आपला पुर्ण पाठींबा दर्शविला.सदर प्रसंगी मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत,जिल्हा संघटक हर्षद पाटील,कर्जत नगरपरीषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.