International Impact

सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती! इंडी आघाडीचा मतपत्रिकेच्या निवडणुकीतही पराभव! - राधाकृष्णन यांना ४५२ तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते, इंडी आघाडीचे ऐक्य फसवे असल्याचे उघड

देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सीपी राधाकृष्णन यांची मंगळवारी निवड झाली. त्यांनी इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ तर रेड्डी यांना अवघी ३०० मते मिळाली.

Read More

उपराष्ट्रपती निवडणूक – बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन दाखल

काँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. नामांकनाच्या वेळी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संसद संकुलातील प्रेरणा स्थळावर महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली. उपराष्

Read More

ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना न्यायालयाची चपराक!

पश्चिम बंगालमध्ये २०१० नंतर देण्यात आलेली ओबीसी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश देऊन कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला जोरदार चपराक लगावली आहे. न्यायालयाचा निर्णय आपण मानणार नाही, असे जाहीर करून ममता बॅनर्जी यांनी आपला संविधान विरोधी चेहरा दाखवून दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवार, दि. २३ मे रोजी दिली. ओबीसी, आदिवासी, दलित समाजाचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा कट भारतीय जनता पार्टी कदापि यशस्वी होऊ द

Read More

देशात व्होट जिहाद हवे की रामराज्य, हे ठरवण्याची निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात व्होट जिहाद हवा की रामराज्य हवे, हे ठरविण्याची ही अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेश येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात व्होट जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे मतदारांनी ठरवायचे आहे. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की तिला दुसरे

Read More

ममता बॅनर्जींना इंडी आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण नाही; नाराजी केली व्यक्त

तीन राज्यात भाजपच्या विजयानंतर इंडी आघाडीच्या बैठकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर, 6 डिसेंबर रोजी दिल्लीत होणारी इंडी आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीएम एमके स्टॅलिन, नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांनी बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी बैठकीला न येण्याचे कारण दिले आहे. या बैठकीसंदर्भात राहुल गांधींनी फोन केल्याचेही सांगितले. ममता बॅनर्जी यांनी यावेळी आपली नाराजी ही बोलून दाखवली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121