२०३० पर्यंत देशातील कापडनिर्यात तिपटीने वाढून, ती नऊ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. आज भारत जगातील सहाव्या क्रमांकाचा कापड निर्यातदार देश आहे. येणार्या काळात तो स्पर्धक देशांना मागे टाकेल, तसेच त्याद्वारे अधिकाधिक रोजगाराला चालना देईल, असे म्हणूनच म्हणता येईल.
Read More
‘परिवर्तन ही संसार का नियम हैं’ - बदल हा विश्वाचा नियम आहे. या शक्तिशाली संदेशाच्या अनुषंगाने, बदलत्या जगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताचा वस्त्रोद्योग वारसा बदलत आहे. तांत्रिक वस्त्रोद्योगातील आपला प्रवास केवळ कापडापुरताच नाही - तो आहे 1.4 अब्ज भारतीयांसाठी स्वप्ने विणणे, भविष्य सुरक्षित करणे आणि शाश्वत उद्याची रचना करणे याबद्दल...
मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम मित्रा पार्कची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नव्या चार स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. तंत्र वस्त्रोद्योगातील महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नवोदितांसाठी संशोधन आणि उद्योजकतेसाठी अनुदान (ग्रेट) योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रूपये अनुदानासह मान्यता देण्यात आली आहे.
धाराशिवच्या कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये तांत्रिक वस्त्र निर्मिती पार्क (टेक्निकल टेक्सटाईल पार्क) उभारण्याच्या कारवाईस गती द्यावी. तसेच या परिसरातील डोंगराळ भागात सोलार प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी दिले.
‘प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह’ योजनेअंतर्गत देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यात आली. ही योजना विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहे. म्हणूनच जागतिक पातळीवर भारत प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ला बळ देणारी, ही योजना म्हणूनच ‘गेम चेंजर’ ठरली आहे.
चीनकडून आयात होणाऱ्या मालावर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यावेळेस आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी कापड कारखानदार आणि कामगारांनी केली असून आयात होणाऱ्या मायक्रो फायबर टॉवेल, मॅनमेड फॅब्रिक्स, टॉवेल, रेडीमेड कपडे यामुळे भारतातील लाखो कामगारांना नुकसान होत आहे.
दिवाळीचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. 'कॅप्टिव्ह मार्केट' असे या योजनेचे नाव असून, त्याअंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दरवर्षी मोफत साडी वितरित केली जाणार आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत ही योजना राबविली जाणार आहे.
देशातील एकंदर निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ७२ अब्ज डॉलर इतका. भविष्यात तो वाढण्यासाठी निर्यातीला चालना देणारे धोरण नुकतेच राज्य सरकारतर्फे मंजूर करण्यात आले. उद्योगधंद्यांना त्याचा थेट फायदा तर होईलच, त्याशिवाय रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल. म्हणूनच निर्यातक्षम महाराष्ट्राला आकार देणारे हे धोरण महत्त्वाचे ठरावे.
९०च्या दशकात ‘डीएड’ करायचे व शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करायची, अशा काळात त्यांनी वेगळी वाट निवडत, कलाक्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली. जाणून घेऊया वर्षा पवार यांच्याविषयी...
आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित केलेल्या नवाथे चौक येथील दहीहंडी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या शिकवणीप्रमाणे सर्वांनी बंधुभावाने राहावे. सर्व जात, पात, धर्म विसरून दहीहंडीतील प्रेमाचा गोपालकाला एकमेकांना वाटून समाजात सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी येथे केले. विकासासाठी कधीही एवढा निधी मिळाला नाही तो आताच्या युती सरकारने दिला आहे. काळजी करू नका, कोणतेही विकासाचे काम थांबणार नाही. लोकांचे प्रेम तुमच्यावर आहे. सरकार पूर्णपणे तु
नुकतीच ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या आणि पाणीसमस्येवर मात करण्याचा विडा उचललेल्या प्रदीप केशव बुडबाडकर यांच्याविषयी...
हजार - दोन हजार वर्षांपूर्वी जेंव्हा भारत जागतिक व्यापाराच्या शिखरावर होता, तेंव्हा त्या व्यापारात सगळ्यात मोठा वाटा होता, कापड उद्योगाचा ! सुती वस्त्र असो किंवा रेशीम – मलमल चे, भारतीयांचा डंका सगळ्या दुनियेत वाजत होता. युरोपला सुती वस्त्रांची ओळख भारताने करुन दिली. त्यांना फक्त लोकरीचे गरम कपडे माहिती होते. कापसाच्या शेतीबद्दल तर ते अनभिज्ञच होते. पूर्व आणि पश्चिम, दोन्ही दिशांचे देश भारतीय वस्त्रांच्या मोहात / प्रेमात पडले होते.
‘लव्ह जिहाद’चा मार्ग ‘ड्रग्ज जिहाद’च्या वाटेवरूनच जातो, नव्हे जी कुणी ‘लव्ह’च्या खोट्या जाळ्यात फसत नाही, तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी ‘ड्रग्ज जिहाद’ आहेच आहे. हिंदू कुटुंब, हिंदू समाज नव्हे, संपूर्ण भारतासमोरचा हा एक मोठा प्रश्न आहे. ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज जिहाद’ व्हाया ‘लस्ट जिहाद’ची परिणीती शेवटी त्या फसलेल्या मुलीच्या नरकयातनायुक्त जगण्यात किंवा क्रूर खुनातच होते. या ‘लव्ह-लस्ट जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’चा संबंध मांडणारा हा लेख. यातील प्रत्येक घटना सत्य आहे. वेळ आली आहे ‘लव्ह जिहाद’ व्हाया ‘ड्रग्ज
१९०५ मध्ये दसर्याच्या दिवशी स्वदेशीच्या पुस्कारार्थ झालेल्या विदेशी कपड्याच्या होळीचे जनक ठरले स्वातंत्र्यवीर सावरकर. राजकारणासाठी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहातून हकालपट्टी झालेले सावरकर हे पहिले विद्यार्थी ठरले.
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह अन्य राज्यात सात ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ उभारण्याची योजना जाहीर केली आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे तब्बल २० लोकांना रोजगार मिळणार आहेत. ‘पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अॅण्ड अपेरल’ योजनेंतर्गत घोषित करण्यात आलेले हे सात प्रकल्प तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये उभारले जाणार आहे.
देशातील वस्त्रोद्योगास चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ‘पंतप्रधान मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’ची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून राज्यात त्याद्वारे दहा हजार कोटींच्या गुंतवणुकीसह ३ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.
वसाहतवादी धोरणांचा बळी ठरलेल्या वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध असलेला असंतोष एकवटण्यासाठी ७ ऑगस्ट, १९०५रोजी स्वदेशी आंदोलनाची हाक देण्यात आली. याची आठवण म्हणून भारतात दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी हातमाग दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया भारतातील पारंपरिक वस्त्रकला अर्थात हातमाग क्षेत्र आणि त्यासाठी सर्वसामान्य भारतीय काय योगदान देऊ शकतो याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशात गेल्या दहा महिन्यांत ३० लाखांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ’कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने’च्या (ईपीएफओ) वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब उजेडात आली असून मार्च २०२२ पर्यंत केंद्र सरकारच्यावतीने या योजनेंतर्गत ५० लाखांहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधान परिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या ‘पुढारी’ ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात.
अग्निशमनदलाच्या ४० गाड्या घटनास्थळी रवाना
स्मृती इराणी यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने महिला कामगारांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना सुरू केल्या आहेत.
‘आर्ट एक्स्पो’सारखी संस्था आणि ‘उज्ज्वल तारा’ सारखा हातमागामधला मराठमोळा ब्रॅण्ड. हातमाग संस्कृतीला विणकरांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविणारी ही उद्योजिका आहे, उज्ज्वल सामंत.