महाराष्ट्र : चीनकडून आयात होणाऱ्या मालावर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यावेळेस आयात होणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी कापड कारखानदार आणि कामगारांनी केली असून आयात होणाऱ्या मायक्रो फायबर टॉवेल, मॅनमेड फॅब्रिक्स, टॉवेल, रेडीमेड कपडे यामुळे भारतातील लाखो कामगारांना नुकसान होत आहे.
दरम्यान, अकक्लकोट येथे रस्ता औद्योगिक वसाहतीत कारखानदार व कामगारांची बैठक झाली. तसेच, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे चीनकडून आयात होणाऱ्या मालावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथील कापड कारखानदार व कामगारांनी केली आहे.