म मराठीचा नाही, तो सत्तेचाच! ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर केशव उपाध्येंचा घणाघात

    05-Jul-2025
Total Views |


मुंबई : म मराठीचा नाही, तो सत्तेचाच, असा घणाघात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीतील डोम सभागृहात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा आयोजित केला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

केशव उपाध्ये म्हणाले की, "गेले अनेक दिवस दोन भाऊ एकत्र येणार म्हणून सुरू असलेला अंक एकदाचा आज उघडला. या दोघांकडून अपेक्षा असणाऱ्यांच्या मनांत निराशाच आली. कारण मराठी, मराठी भाषा याबद्दल काय होतं या कार्यक्रमात?" असा सवाल त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, "वाजत गाजत दोन्ही भाषणे झाली, पण या भाषणात मराठीसाठी काही कार्यक्रम? मराठी भाषेच्या विकासासाठी काही धोरण? मराठी युवकाला प्रगतीसाठी काही दिशादर्शक? या सगळ्याचे उत्तर नाही. उध्दव ठाकरेंचे भाषण तर नेहमीच टोमणे मारणारे. भाजपावर, मोदीजीवर टीका करणारे होते. शेवटी तर त्यांनी कबुली पण दिली महापालिकेसाठीच नाही तर महाराष्ट्रातसुध्दा जिंकण्यासाठी आम्ही एकत्र आलो," अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.