महाराष्ट्रात ‘व्हर्टिपोर्ट’च्या विकासासाठी समिती नेमण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. जागतिक दर्जाची परिवहन व्यवस्था उभारण्यावर राज्य सरकार भर देत असून, याच पार्श्वभूमीवर ‘व्हर्टिपोर्ट’ नेमके कसे उभारण्यात येतात; जागतिक स्तरावर या संकल्पनेचा विकास लसा झाला याचा आढावा घेऊया.
‘व्हर्टिपोर्ट’ ही एक विशेष पायाभूत सुविधा आहे, जी ‘इलेट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लॅण्डिंग’ अर्थात ‘इव्हिटोल’, ज्यांना ‘एअर टॅसी’देखील म्हणतात. अशा एअर टॅक्सी आणि इतर ड्रोनच्या व्हर्टिकल टेकऑफ आणि लॅण्डिंगची सुविधा देण्यासाठी डिझाईन केलेली व्यवस्था आहे. ही हेलिपॅडची आधुनिक आवृत्ती आहे. यामध्ये उदयोन्मुख ‘इव्हिटोल’ तंत्रज्ञानावर आणि त्याच्या अद्वितीय आवश्यकतांवर लक्ष केंद्रित केले जाते. शहरांमध्ये सुरक्षित आणि कार्यक्षम लॅण्डिंग आणि टेकऑफ स्थाने प्रदान करून, व्हर्टिपोर्ट्स शहरी हवाई गतिशीलतेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा आहे.
२०२२ हे वर्ष ‘व्हर्टिपोर्ट’ डिझाईन शिफारसी आणि मानकांच्या प्रकाशनासाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरले. ‘युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी’ने मार्च २०२२ मध्ये, जगातील पहिले ‘व्हर्टिपोर्ट’ डिझाईन स्पेसिफिकेशन प्रकाशित केले. व्हर्टिपोर्ट्ससाठी प्रोटोटाईप टेनिकल डिझाईन स्पेसिफिकेशन हे ग्राऊंड इन्फ्रास्ट्रचरसाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करते.
ऑगस्ट २०२२ साली ‘एसएसटीएम इंटरनॅशनल’ या मानक विकास संस्थेने, राज्ये आणि नगरपालिकांसाठी व्हर्टिपोर्ट्सच्या डिझाईन आणि विकासावर मार्गदर्शन प्रदान करणारे एक नवीन मानक प्रकाशित केले. ‘एसएसटीएम इंटरनॅशनल’ ही एक मानक संस्था आहे, जी विविध प्रकारचे साहित्य, उत्पादने, प्रणाली आणि सेवांसाठी तांत्रिक आंतरराष्ट्रीय मानके विकसित करते.त्यांनी व्हर्टिपोर्ट्सच्या मानकात व्हर्टिस्टॉप डिझाईनसाठी स्पेसिफिकेशनदेखील सूचीबद्ध केले. व्हर्टिस्टॉप जरी व्हर्टिपोर्ट्ससारखे असले, तरी ते फक्त प्रवाशांना आणि मालवाहतुकीला ऑनबोर्डिंग किंवा ऑफबोर्डिंगसाठी बांधले जातात. हे इंधन भरण्यासाठी किंवा नियोजित देखभालीसाठी परवानगी देत नाहीत.
सप्टेंबर २०२२ साली ‘फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘एफएए’ने व्हर्टिपोर्ट्ससाठी त्यांची मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली. या दस्तऐवजात सुरक्षा महत्त्वपूर्ण डिझाईन घटक, चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी शिफारसी आणि विद्यमान व्यावसायिक विमानतळांवर ‘व्हर्टिपोर्ट’ बांधकामासाठी आवश्यकता समाविष्ट होत्या. ‘एफएए’च्या ध्येयात विमान वाहतूक सुरक्षिततेला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय हवाई क्षेत्र प्रणालीचे व्यवस्थापन कार्यक्रमाचा विकास आणि प्रकाशन याचा समावेश आहे.
फेब्रुवारी २०२५ साली जागतिक ‘व्हर्टिपोर्ट’ मार्केट मॅप आणि फोरकास्ट २०२५-२०२९ या अहवालानुसार, जगभरातील एक हजार, ५०४ व्हर्टिपोर्ट्स किंवा इव्हिटोल ऑपरेटर्स नेटवर्क विकसित करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबर २०२४ च्या अहवालापेक्षा ही संख्या ५००ने वाढली आहे. हे व्हर्टिपोर्ट्स बांधण्यासाठी आणि त्यांना सर्व तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी एक हजार, ५५४.२ दशलक्ष यूएस डॉलर इतका खर्च अपेक्षित आहे. २०२४ साली जागतिक स्तरावर फक्त २४ व्हर्टिपोर्ट्सवर बांधकाम सुरू झाले. २०२७ सालापर्यंत केवळ ग्वांगडोंग प्रांतात १०० हून अधिक व्हर्टिपोर्ट्स बांधण्याची चीनची योजना आहे.
जगभरातील शहरे पारंपरिक वाहतुकीच्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. अशावेळी शहरी हवाई गतिशीलतेच्या उदयासह आणि इव्हिटोल विमान किंवा हवाई टॅसी, शहरी वाहतुकीत क्रांती घडवून आणतील. लॅण्डिंग आणि टेकऑफसाठी हवाई टॅसीला ‘व्हर्टिपोर्ट’ची आवश्यकता असते. विशेष सुविधा ज्या सुरक्षित वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा प्रदान करतात. यामध्ये कार्यक्षम प्रवासी बोर्डिंग, कार्गो हाताळणी, देखभाल, बॅटरी चार्जिंग, ऊर्जा व्यवस्थापन आणि सुरक्षित ऑपरेशन्ससाठी उपाय समाविष्ट आहेत. या हवाई टॅसी उभ्या दिशेने उड्डाण आणि उतरू शकतात, म्हणून त्यांना लांब धावपट्टीची आवश्यकता नाही. तथापि, त्यांच्या अद्वितीय लॅण्डिंग आणि ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी, अजूनही विशेषतः डिझाईन केलेले ‘व्हर्टिपोर्ट’ आवश्यक आहेत. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञान आणि संधीचीही अपेक्षा आहे.