तेहरान: इस्रायल-इराण युद्धसंघर्षाच्या पाश्वभूमीवर इराणने नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अनइनस्टॉल करण्याचे आवाहन केले आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहीनीवर प्रसारित झालेल्या या आवाहनात असे दाखवण्यात आले आहे की, व्हॉट्सअॅप हे इस्रायलसोबत डेटा शेअर करण्यासाठी वापरकर्त्यांचा डेटा गोळा करत आहे. परंतू व्हॉट्सअॅपने हे आरोप नाकारले आहेत.
इराणने आपल्या नागरिकांना त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप अनइनस्टॉल करण्याच्या आवाहनावर, व्हॉट्सअॅपने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. "व्हॉट्सअॅपला अशा खोट्या आरोपांनी बदनामी सहन करावी लागत असून व्हॉट्सअॅपच्या सेवेत व्यत्यय येऊ शकतो." असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
"व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेसाच्या रक्षणासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरते, व्हॉट्सअॅप कोणताही डेटा ट्रॅक करत नाहीत, कोण कोणाला मेसेज करतो याचे रेकॉर्डसुध्दा ठेवत नाहीत. वापरकर्त्यांमध्ये केल्या जाणाऱ्या संदेशांवरसुध्दा लक्ष ठेवत नाहीत." याशिवाय, व्हॉट्सअॅपने सांगितले की, "ते जगातील कोणत्याही सरकारला माहिती पुरवत नाही."
मागील काही वर्षांपासून, इराणने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणली आहे. परंतु इराणमधील अनेक लोक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी प्रॉक्सी आणि व्हीपीएन सारख्या गोष्टींनी बायपास करतात.