"काँग्रेस पक्ष दिशाहीन झालाय, पक्षात मोठी..."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

    19-Jun-2025
Total Views | 19


मुंबई : काँग्रेस पक्ष हा एकप्रकारे दिशाहीन झाला आहे. त्यामुळे पक्षात मोठी निराशा पाहायला मिळते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवार, १८ जून रोजी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "काँग्रेस पक्ष हा एकप्रकारे दिशाहीन झाला आहे. आम्हीसुद्धा अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केले. पण विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीही आपली देशहिताचा आणि समाजहिताचा विचार सोडला नाही. त्यामुळे समाज आमच्यासोबत आला आणि आम्हाला पून्हा पून्हा निवडून दिले. आज दुर्दैवाने काँग्रेसमध्ये दिशाहीन नेतृत्व दिसत आहे. त्यामुळे ज्यांना देशासाठी काम करायचे आहे त्यांना तिथे आपले भवितव्यच दिसत नाही. काँग्रेस पक्षात मोठी निराशा पाहायला मिळते. तसेच जमिनीशी जोडलेल्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे हे नेते आमच्याकडे येत आहेत," असे ते म्हणाले.


ते पुढे म्हणाले की, "वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात प्रचंड मोठे कार्य केले असून आजही त्यांचे नाव घेतले जाते. त्यानंतर जयश्रीताईंनी या कार्याची धूरा सांभाळली. परंतू, पक्षाने त्यांना सांभाळले नाही. गेल्या अनेक वर्षात त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांनी भाजपमध्ये यावे अशी आमचीसुद्धा इच्छा होती. गेल्या १० ते १२ वर्षात सांगली जिल्ह्यात भाजपचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढले. भाजपमध्ये सगळे पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत होतात. परंतू, वसंतदादा पाटील यांच्या घराणाची विरासत सांगणाऱ्या वहिनींचा हा प्रवेश असल्याने मी या पक्षप्रवेशाला उपस्थित राहिलो. भाजप हा आपला परिवार असून जयश्री पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना इथे परिवारासारखीच वागणूक मिळेल. तुमची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे," असेही ते म्हणाले.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121