भारतावर हल्ला केल्यास होणार केवळ विनाश - पंतप्रधान मोदी
14-May-2025
Total Views | 22
नवी दिल्ली: ( PM Modi on war ) भारताच्या आदमपूर हवाईतळावर हल्ला केल्याची ‘फेकन्यूज’ पाकिस्ताने पसरविली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आदमपूर हवाईतळावर जाऊन आणि तेथील वायुयोद्धांशी संवाद साधून खोट्या बातमीचा सणसणीत ‘फॅक्टचेक’ केला.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आणि एस-४००सह मिग लढाऊ विमानांनी सज्ज असलेल्या आदमपूर हवाईतळास भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुयोद्ध्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक सामान्य लष्करी कारवाई नाही तर भारताच्या धोरण, उद्देश आणि निर्णायक क्षमतेचे त्रिमूर्ती आहे", असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत ही बुद्ध आणि गुरु गोविंद सिंह यांची भूमी आहे.
धर्माच्या स्थापनेसाठी अधर्माविरुद्ध शस्त्र उचलणे ही नेहमीच भारताची परंपरा राहिली आहे. जेव्हा दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचे धाडस केले तेव्हा भारतीय सैन्याने त्यांचे अभयारण्य नष्ट केले. भारतीय सैन्याने ९ प्रमुख दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले आहेत. भारतात निष्पाप रक्त सांडण्याचे अपरिहार्य परिणाम हा विनाशच आहे, हे दहशतवादाच्या आकांना आता समजले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर हताश होऊन,शत्रूने भारताच्या अनेक हवाईतळांना लक्ष्य करण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र,पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रत्येक प्रयत्न निर्णायकपणे हाणून पाडण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखीत केले. ते पुढे म्हणाले, भारताच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेसमोर पाकिस्तानी ड्रोन,यूएव्ही, विमाने आणि क्षेपणास्त्रे पूर्णपणे अपयशी ठरले. भारताची सज्जता आणि तांत्रिक सामर्थ्याने शत्रूच्या हल्ल्यांना पूर्णपणे निष्प्रभ ठरवले, यावर त्यांनी भर दिला. देशाच्या हवाई तळांवर देखरेख ठेवणाऱ्या नेतृत्वाची आणि भारतीय हवाई दलाच्या प्रत्येक हवाई योद्ध्याची त्यांनी मनःपूर्वक प्रशंसा केली. त्यांची अतुलनीय कामगिरी आणि देशाच्या रक्षणासाठी केलेले अजोड समर्पण, याची त्यांनी प्रशंसा केली.
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका आता स्पष्ट झाल्याचे नमूद करून, भारतावर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला, तर देश निर्णायक आणि जोरदार प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधानांनी घोषित केले. आता भारताकडे असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याची बरोबरी पाकिस्तान करू शकत नाही. गेल्या दशकात भारतीय हवाई दल व इतर सेना दलांना जगातील आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानांपैकी काही तंत्रज्ञान मिळाले आहे.
मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबत मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते, या क्लिष्ट प्रणालींचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी कौशल्य, अचूकता आणि सातत्य असावे लागते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. भारताच्या सशस्त्र दलांनी युद्धकौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे सुरेख एकत्रीकरण करून आधुनिक युद्धनीतीत आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी जाहीर केले की भारतीय हवाई दल आता शस्त्रांसोबतच डेटा आणि ड्रोनच्या साहाय्यानेही शत्रूला सामोरे जाण्यात पारंगत झाले आहे.
‘आकाश’ आणि ‘एस-४००’ ठरले विशेष प्रभावी
ऑपरेशन सिंदूर दरम्यान मनुष्यबळ आणि प्रगत तंत्रज्ञान यातील विलक्षण समन्वय अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सांगितले की,
- भारताच्या पारंपरिक हवाई संरक्षण यंत्रणेला स्वदेशी 'आकाश' प्रणाली आणि एस-४०० सारख्या अत्याधुनिक प्रणालींची मजबूत जोड लाभली. भारताचे सुरक्षाकवच ही महत्त्वाची ताकद ठरली आहे.
- पाकिस्तानच्या वारंवार प्रयत्नांनंतरही भारताचे हवाई तळ आणि महत्त्वाची संरक्षण पायाभूत सुविधा पूर्णतः सुरक्षित राहिली.
- पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की आता भारताकडे असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्याची बरोबरी पाकिस्तान करू शकत नाही. गेल्या दशकात भारतीय हवाई दल व इतर सेना दलांना जगातील आधुनिक संरक्षण तंत्रज्ञानांपैकी काही तंत्रज्ञान मिळाले आहे.
- मात्र, या नव्या तंत्रज्ञानासोबत मोठ्या आव्हानांनाही सामोरे जावे लागते, या क्लिष्ट प्रणालींचे संचालन आणि देखभाल करण्यासाठी कौशल्य, अचूकता आणि सातत्य असावे लागते, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
- भारताच्या सशस्त्र दलांनी युद्धकौशल्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे सुरेख एकत्रीकरण करून आधुनिक युद्धनीतीत आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी जाहीर केले की भारतीय हवाई दल आता शस्त्रांसोबतच डेटा आणि ड्रोनच्या साहाय्यानेही शत्रूला सामोरे जाण्यात पारंगत झाले आहे.