पाकिस्तानचा विकृत चेहरा, भारतीय शाळांसह धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा प्रयत्न

- परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पाकला झोडपले

    10-May-2025
Total Views | 11
 
Foreign Secretary Vikram Misri on Pakistan
 
नवी दिल्ली: - ( Foreign Secretary Vikram Misri on Pakistan ) पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) गुरुद्वारा, चर्च, मंदिरे आणि शाळांवर गोळीबार करत आहे. अशाप्रकारे शाळा आणि प्रार्थनास्थळांसह नागरी पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करूच पाकने आपली विकृती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत पाकला झोडपले आहे.
 
शुक्रवारी पत्रकार परिषदेत मिस्री म्हणाले की, नियंत्रण रेषेवरील शाळा आणि धार्मिक स्थळांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याबद्दल, ७ मे रोजी पहाटे नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार करताना, पाकिस्तानकडून डागण्यात आलेला एक गोळीबार पूंछमधील क्राइस्ट स्कूलच्या मागे पडला. तो गोळीबार शाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या घरावर पडला, ज्यांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला आणि त्यांचे पालक जखमी झाले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात अनेक शाळेतील कर्मचारी आणि स्थानिकांनी शाळेच्या भूमिगत हॉलमध्ये आश्रय घेतला. सुदैवाने शाळा बंद होती, अन्यथा अधिक नुकसान झाले असते. पाकिस्तान गुरुद्वारा, चर्च आणि मंदिरांसह प्रार्थनास्थळांना लक्ष्य करत आहे. याद्वारे पाकने त्यांची विकृतीची पातळी अधिकच घसरली असल्याचे दाखवून दिल्याचे मिस्री म्हणाले.
 
अमृतसरसह भारतीय शहरांना लक्ष्य करून नागरी आणि लष्करी पायाभूत सुविधांवर केलेल्या कारवाईबद्दलही मिस्री यांनी पाकिस्तानवर टीका केली. भारत स्वतःच्या भूभागावर हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा "अनाठायी आणि अपमानजनक" असल्याचे मिस्री यांनी फेटाळून लावले. नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ल्याबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न त्यांनी उघड केला.
 
पाकिस्तान आपल्या हल्ल्यांची जबाबदारी घेण्याऐवजी, भारतीय सशस्त्र दल अमृतसरसारख्या त्यांच्या स्वतःच्या शहरांना लक्ष्य करत आहेत आणि पाकिस्तानला दोष देण्याचा प्रयत्न करत आहेत असे निरर्थक दावे केले आहेत. मात्र, आपल्या शहरांना लक्ष्य करण्याचा पाकचाच पूर्वेतिहास असल्याचीही सणसणीत आठवण मिस्री यांनी यावेळी करून दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121