मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 'एआय अनझिप्ड' पुस्तकाचे प्रकाशन!
08-Mar-2025
Total Views |
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या दिवशी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. अपूर्वा पालकर लिखित 'एआय अनझिप्ड' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
सह्याद्री अतिथीगृहावर हा पुस्तक अनावर सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, लेखिका प्रा. अपूर्वा पालकर, डॉ. अमित जाधव, प्रकाशक मंदार जोगळेकर, डॉ. राजेंद्र तलवारे, प्र. कुलसचिव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लेखनाबद्दल लेखकांचे अभिनंदन केले. तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे विद्यार्थीनी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु असलेल्या Code Without Barriers, AI Inititive with Microsoft यामध्ये सुरु असलेल्या १० हजार विद्यार्थिनी आणि महिलांचे प्रशिक्षणाचे कौतूक केले. यासोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीदेखील या पुस्तकाचे कौतुक केले. सर्व महिला, विद्यार्थी आणि दैनंदिन कामकाजात एआयचा वापर करणारे नव उद्योजक आणि संशोधकांसाठी उपयोगी ठरेल, असे सांगितले.