मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Salesman impersonating Aurangzeb) छत्रपती संभाजी महाराजांविरोधात आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ निंदनीय पोस्ट केल्याप्रकरणी एका धर्मांधाविरोधात रविवार, दि. २ मार्च रोजी काळाचौकी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. अनस कुरेशी असे त्याचे नाव असून भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम २९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. लालबाग - परळ परिसरातील हिंदू तरुणांनी तातडीने सदर प्रकार उघडकीस आणत त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
हिंदू कार्यकर्त्यांनी यासंदर्भात तपास केला असता सदर आरोपी हा लालबागमधील मेहता मेशन इमारतीमध्ये असलेल्या सॅमसंग स्मार्ट प्लाझा या मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचे दुकानात सेल्समन म्हणून सॅमसंग कंपनीकडून नोकरीस असल्याचे समजले. संबंधित सेल्समनचा शोध घेतला आणि तो ज्या दुकानात काम करतो, त्या दुकानमालकाशी संपर्क साधला. यानंतर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, आरोपी अनस कुरेशीने त्याच्या व्हॉट्सअप पोस्ट मध्ये औरंगजेबाचा फोटोवर शेअर करत, त्यावर हबीबी... जो हमे हरा नहीं पाए मैदान-ए-जंग में और वो हमसे बदला ले रहें है मैदान ए सिनेमा हॉल में' असे लिहिले होते. उद्देशपूर्वक हिंदू धर्माच्या धार्मिक भावना व श्रद्धा दुखवण्याचा हा असून आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे.
तक्रारदार रवींद्र दाभोलकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीली पोलिसांनी आरोपीस फोन करून माफी मागायला लावली, त्यानुसार त्याने फोनवरच माफी मागितली देखील. मात्र समोर येऊन माफी मागावी असा समस्त कार्यकर्त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या वाढत्या संतापामुळे पोलिसांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या आणि अनस कुरेशीला तातडीने ताब्यात घेतले. या आंदोलनाचे नेतृत्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रवींद्र दाभोलकर, गिरीश भोसले, श्रीपाद सावंत, अक्षय नाईक, सागर भाकरे, रोहित ठाकूर, सागर म्हात्रे, राहुल लोध, प्रणव सिंग, रोहित कांबळे, रोहीत सिंग, ॲड. भूमकर, इंद्रजित तिवारी यांनी केले.