स्वदेशी बनावटीच्या पहिल्या फ्युजलेजची निर्मिती

    10-Mar-2025
Total Views |

Rajnath Singh
 
नवी दिल्ली : ( Rajnath Singh ) भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी सरकारने स्वदेशी मार्गाचा अवलंब केला आहे. डीआरडीओ, एचएएल आणि भारतीय खाजगी कंपन्या त्यासाठी कार्यरत आहेत. याच मालिकेत एलसीए मार्क १ए चा पहिला मागील भाग अर्थात फ्युजलेज एचएएलला सुपूर्द करण्यात आले. हे फ्यूजलेज अल्फा टोकॉल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीने तयार केले आहे.
 
संरक्षण मंत्री राजनथ सिंह यांनी एचएएल आणि खासगी क्षेत्र सशस्त्र दलांना सातत्याने नवीनतम प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करत आहेत अशा शब्दांत त्यांची प्रशंसा केली आहे. एचएएल आपल्या एकात्मिक मॉडेल आणि धोरणांद्वारे केवळ सैनिकांचे सामर्थ्य वाढवत नाही तर खासगी क्षेत्राशी सहकार्य करून उत्पादन तसेच संशोधन आणि विकासाचे नवीन आयाम देखील उघडत आहे, असे ते म्हणाले.
 
एचएएलने याआधीच एलसीए एमके १ ए मागील भागाचे १२ फ्यूजलेज तयार केले आहेत, जे विमानांमध्ये जोडले जाण्याच्या मार्गावर आहेत. या पुरवठ्यासह, भारतीय खासगी भागीदाराने तयार केलेले एक प्रमुख रचनात्मक मॉड्यूल एल सी ए एम के १ ए विमानात एकत्रित केले जाईल, ज्यामुळे २०२५-२६ पासून एचएएलला भारतीय हवाई दलासाठी अतिरिक्त वितरण वचनबद्धतेची पूर्तता करता येईल.