वसंत पंचमीच्या दिवशी विविध आखाड्यांसह अन्य भाविकांनी सकाळपासूनच अमृतस्नान करण्यास सुरुवात केली. यावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या महाकुंभात वसंत पंचमीपर्यंत ३४.९ कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती आहे. योगी सरकारच्या आकडेवारीनुसार काही दिवसांत हा आकडा ४० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वसंत पंचमीच्या अमृतस्नान उत्सवानिमित्त भाविकांना सुरक्षित स्नानासाठी २८ धोरणात्मक मुद्यांची तरतूद करण्यात आली होती. तसेच यापूर्वी असे कार्यक्रम आयोजित करण्याचा अनुभव असलेले आणखी अनेक अधिकारी येथे तैनात करण्यात आले होते.
शेवटचे अमृतस्नान
महाकुंभात आलेल्या आखाड्यांनी हे त्यांचे शेवटचे अमृतस्नान असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर ते वाराणसीला जाण्याबाबत घोषणा केली. असे असले तरी ठरलेल्या वेळेपर्यंत महाकुंभ सुरुच राहणार आहे.