मशिदीबाहेर असलेली विहिर खुली करावी, व्यवसथापन समितीने सर्वोच्च न्यायालयात घेतील धाव
09-Jan-2025
Total Views |
लखनऊ : संभलमधील शाही जामा मशिदीच्या व्यवस्थापन समितीने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मशिदीच्या प्रवेशाच्या भागात असलेल्या खाजगी विहिरीसंदर्भामध्ये मूल्यांची सद्याची स्थिती पाहता निर्देश राखण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे.
मशिदीच्या संबंधित समितीने सर्वोच्च न्यायालयाकडे हातजोडून विनंत केली की, जिल्हा दंडाधिकाऱ्यांना विहिरीच्या तपासणीबाबत कोणतीही कारवाई करू नये. त्याचप्रमाणे मशिदीबाहेर बांधण्यात आलेली विहीर सर्वांसाठी खुली करावी.
जिल्हा प्रशासन, संभल शहरातील जुनी मंदिरे आणि विहिरी पुनरुज्जीवित करण्यासाठी एक कथित मोहिम राबवत आहेत. ज्यात असे दिसून आले की, किमान पुरातनकालीन मंदिरांना पुनरुज्जीवित करण्यात आले असून १९ विहिरी ओळखल्या गेल्या आहेत. त्यांचा वापर आता सार्वजनिकरित्या प्रार्थनेसाठी केला जात आहे.
जिल्हा प्रशासनाने, जुनी मंदिरे आणि विहिरींच्या पुनरज्जीवित करण्याच्या त्यांच्या कथित मोहिमेमध्ये विहिरीच्या वापरासाठी विहिर खुली करण्यात यावी, असे म्हणत विहिरींना धार्मिक महत्त्व असल्याचे त्यात म्हटले आहे.
संभळमधील जामा मशिदीजवळ विहिरींचे स्थान दर्शवणारे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. ज्यात मशिदीला मंदिर म्हणून दाखवण्यात आले आहे. मशिदीच्या समितीने म्हटले की, याबाबत त्यांना शंका उपस्थित होत आहे. यामुळे मशिदी समितीने प्रशासनाला या संदर्भामध्ये कायदेशीर नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात येत आहे.